*सर सेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्र.4 मध्ये स्काऊट गाईड मेळावा उत्साहात संपन्न झाला.*
तळेगाव दाभाडे :
द बॉय स्काऊट्स व गर्ल गाईड्स असोसिएशनचे संस्थापक व पहिले चिफ स्काऊट लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्रमांक ४ यांनी कब बुलबुल व स्काऊट गाईड मेळावा नगरपरिषद शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता .या मेळाव्यात थोर समाजसेवक नथुभाऊ बाबुराव भेगडे पाटील शाळा क्रमांक २ चे स्काऊट पथक व वीर जिजामाता कन्या शाळा प्राथमिक क्रमांक ५ च्या गर्ल गाईड पथकाने सहभाग घेतला होता. डोळसनाथ कॉलनी तळेगाव दाभाडे येथील गणपती मंदिरातील उद्यानात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याचे उद्घाटन व ध्वजारोहण गणेश विद्यामंदिर प्राथमिक शाळा क्रमांक ७ चे मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे यांनी केले. यावेळी डोळसनाथ कॉलनी मधील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री नवनाथ कुल, मुख्याध्यापक अनिता तिकोने मॅडम, निकिता शितोळे, प्राची लोमटे, धनश्री चौधरी, विष्णू महाजन उपस्थित होते.
ध्वजारोहण ,मानवंदना ,संचलन, संगीत कवायत ,कृतीयुक्त गीत सादरीकरण ,खेळ,सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम घेण्यात आले. नवनाथ कुल यांच्या हस्ते बेस्ट स्काऊट कॅंडिडेट व बेस्ट गाईड कॅंडिडेट यांचा सत्कार करण्यात आला . त्यांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप केले. शेकोटीच्या उपक्रमाने कार्यक्रमाची सांगता झाली. मेळाव्याचे नियोजन मुख्याध्यापिका अनिता तिकोने यांनी केले. निकिता शितोळे व प्राची लोमटे यांनी संयोजन केले