माजी राज्यमंत्री संजय(बाळा) भेगडे व किसान मोर्चाचे गणेश भेगडे यांचे महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य पदी नियुक्ती
तळेगाव दाभाडे:
Advertisement
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने माजी राज्यमंत्री संजय विश्वनाथराव भेगडे. आणि भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश किसनराव भेगडे यांची महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ही नियुक्ती करण्यात आली असून राज्य परिषदेत वरिष्ठ भाजप नेत्यांचा समावेश असून महाराष्ट्रातून एकूण ४५४ सदस्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.






