क्रेडल ऑफ लाइफ, अंबी येथे क्लबचा चार्टर नाईट आणि सत्कार समारंभ अतिशय थाटात संपन्न.
तळेगाव दाभाडे:
रविवार दिनांक 31 मार्च 2024 रोजी *क्रेडल ऑफ लाइफ*, अंबी येथे क्लबचा चार्टर नाईट आणि सत्कार समारंभ अतिशय थाटात संपन्न झाला.या दिमागदार समारंभात जवळ जवळ 50 लायन्स सभासद उपस्थित होते.या अविस्मरणीय समारंभाचे उत्कृष्ट आणि अतिसुंदर सूत्रसंचालन लायन राधेश्याम भंडारी यांनी केल्याने या समारंभाची उंची क्षणाक्षणाला वाढतच गेली. या समारंभास किनारा वृद्धाश्रमाच्या संचालिका वैद्य मॅडम आणि गेस्ट ऑफ ओनर म्हणून हरिश्चंद्रजी गडसिंग हेही उपस्थित होते. याच अविस्मरणीय समारंभात लायन दीपकभाई शहा यांनी किनारा वृद्धाश्रमास देऊ केलेल्या सहा गुंठे जागेतच वस्तीगृहातील वृद्धांसाठी अन्नपूर्णागृह- भोजन गृह व विरंगुळाकेंद्र या विविध वास्तूंचे संपूर्ण बांधकाम आपल्या सौजन्याने पूर्ण करण्याचा संकल्प सोडला.यासाठी संस्थेच्या संचालिका प्रीती वैद्य यांनी पीडीजी लायन दीपकभाई शहा यांच्या विषयीची संस्थेतर्फे अतिशय भावपूर्ण शब्दात आपली कृतज्ञता व्यक्त केली. हा संकल्प सिद्धीस जाण्यास दीपकभाई शहा यांना लक्ष लक्ष शुभेच्छा देऊन दीपकभाईंचं सर्व लायन सभासदांतर्फे अभिष्टचिंतन करण्यात आलं.त्यानंतर मावळी फेटा प्रदान करून त्यांचा यथोचित गौरवही करण्यात आला.तसेच आंबेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी शाळेत येण्यासाठी सात आठ किलोमीटर अंतर पायी प्रवास करतात, त्यांच्यासाठी 25 सायकल देण्याची लायन्स क्लबतर्फे घोषणा करण्यात आली. त्यासाठी लायन अध्यक्ष अनिकेत काळोखे यांनी दोन सायकल, लायन शेखर चौधरी यांनी एक सायकल ,लायन गोपाळघरे यांनी एक सायकल देण्याचे जाहीर केले.जेष्ठ लायन सभासद डॉक्टर शालिग्राम भंडारी ,लायन भरत पोतदार, लायन महेश भाई शहा यांचाही पुणेरी पगडी देऊन त्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.त्यानंतर आंतरराष्ट्रीय लायन संस्थेचे प्रवर्तक मेलबिन जोन्स यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून केक कापून चार्टर्ड नाईट समारंभ संपन्न झाला. त्यानंतर उपस्थित मान्यवर विशेष अतिथी रोटेबियन हरिश्चंद्रजी गडसिंग यांच्या समवेत सर्व लायन सभासदांनी अतिशय स्वादिष्ट भोजनाचा आनंद लुटला.त्यानंतर वन मिनिट गेम्सचा आनंदही सर्वांनी अनुभवला. या कार्यक्रमास स्वतःचा क्लब हाऊस उपलब्ध करून देणारे सूत्रधार हरिश्चंद्र गडसिंग साहेब यांचेही लायन्स क्लबतर्फे अध्यक्षांनी मनापासून आभार मानलेत.चार्टर् नाईट सेलिब्रेशनसाठी अतिशय निसर्गरम्य स्थळ विनाविलंब क्लबला प्राप्त करून दिल्याबद्दल लायन डॉक्टर शालिग्राम भंडारी यांनाही अध्यक्षांनी मनःपूर्वक धन्यवाद दिलेत. समारंभाचा सांगता समारंभ संपन्न झाल्यावर सभागृहातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक लायन्स सभासदांच्या चेहऱ्यावर विलसत असलेला विलक्षण आनंद- समाधान- आणि तृप्तता हीच या समारंभाच्या यशस्वीतेची खरी पावती होती.