बालभवन मध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा
तळेगाव दाभाडे:
“पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निमित्त बालभवनमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात बालदिन साजरा झाला..मुलं आणि पालक असे एकत्रितपणे खेळ घेण्यात आले.तिपाई शर्यत,संगीतखुर्ची असे आपल्या आई,आजीबरोबर खेळ खेळतांना मुले आनंदाने उड्या मारत होती.आज्या सुध्दा नातवडांचं बोट धरुन खुर्ची पकडण्यासाठी धावत होत्या आणि ते बघतांना खूप गंम्मत वाटत होती.तिपायी शर्यतीत पाय बांधल्यामुळे मुलं धडपडत होती,पडत होती तरीही न रडता पळत होती.मुलांबरोबर मोठ्ठ्यांमधलं दडलेलं मूल सुध्दा आनंदाने खेळांचा आनंद घेत होतं.चिमुकल्यांबरोबर खेळ खेळताना त्यांच्या चेहेर्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. कलापिणीमध्ये सगळेच कार्यक्रम खूप छान होतात आणि बालभवन मध्ये सुद्धा खूप छान उपक्रम राबवले जातात पालकांनाही सहभागी करून घेतले जाते आजच्या कार्यक्रमात मुलांच्या आईबरोबर काही मुलांच्या आजींनी सुद्धा सहभाग घेतला होता आपलं वय विसरून नातवाबरोबर खेळताना अगदी बालपणीची आठवण झाली अशा प्रतिक्रिया या आजींनी दिल्या मुलांबरोबर पालकांनाही सहभागी करून घेतल्यामुळे आम्हाला हा आनंद अनुभवता आला असेही अनेक पालकांनी सांगितले बाल भवन प्रमुख मधुवंती रानडे यांनी सर्व पालकांचं स्वागत करुन मुलांना बालदिनाची माहिती सांगितली.एकदरीत आजचा बालदिन धम्माल,उत्साह,आनंद,जल्लोषात झाला.बालदिनानिमित्य मुलांना खाऊ देण्यात आला.बालभवन प्रमुख मधुवंती रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती ढमाले,मीरा कोण्णूर,माधवी एरंडे,मनिषा शिंदे,रुपाली पाटणकर, विशाखा देशमुख आणि श्री.राम रानडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्तम केले.






