आम्ही सांगू त्या दुकानातूनच शालेय वस्तू खरेदी करा. तळेगावातील खाजगी शाळांची मनमानी
तळेगाव दाभाडे:
शहरासह मावळ तालुक्यातील अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा आम्ही सांगू त्या दुकानातूनच शालेय वस्तू. गणवेश खरेदी करा अशा प्रकारे या शाळा मनमानी करत असून पालकांना वेठीस धरण्याचे काम या खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा करत आहेत. असा आरोप तळेगाव सह मावळ तालुक्यातील अनेक नागरिकांनी केला आहे. या संदर्भात तळेगाव दाभाडे चे माजी नगरसेवक. सामाजिक कार्यकर्ते. अरुण बबनराव माने. माहिती अधिकार कार्यकर्ते जयवंतराव कदम यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे. आमदार. जिल्हाधिकारी. शिक्षणाधिकारी. मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या माध्यमातून निवेदन पाठवण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पालकांनी त्यांच्या पाल्यासाठी वह्या. पुस्तके. गणवेश. शालेय वस्तू शाळेतूनच किंवा आम्ही सांगू त्या दुकानातूनच घ्यावेत. अशी सक्तीच या इंग्रजी माध्यमाच्या बहुसंख्य शाळा करत आहेत. त्याद्वारे या शाळा आणि विक्रेते नफेखोरी करत आहेत. अवास्तव दरात शालेय साहित्य विक्री होत असल्याने पालकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या शाळांवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.या संदर्भात बोलताना माजी नगरसेवक अरुण माने म्हणाले की या इंग्रजी माध्यमांच्या शिक्षण संस्थेने पालकांकडे विशिष्ट दुकानातूनच गणवेश व शालेय वस्तूंची खरेदी करण्याची सक्ती करणे चुकीचे आहे. या चुकीच्या प्रकारांना आमचा नेहमीच विरोध राहिला आहे. या शिक्षण संस्थांना कधी चाप बसणार? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.