# महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परप्रांतीय सुपरवायझरला शिकवला धडा#
लोणावळा:
लोणावळा शहरातील स्टेट बँकेच्या गेस्ट हाऊस मध्ये काम करणाऱ्या स्थानिक मराठी कामगारांना त्रास देत असलेल्या व स्थानिक कामगारांना कामावरून काढून टाकण्याची धमकी देत असणाऱ्या परप्रांतीय सुपरवायझरला महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराचे शहराध्यक्ष निखिल भोसले. पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी मनसे स्टाईलने धडा शिकवला. स्थानिक कामगारांनी यासंदर्भात तक्रार केली असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गेस्ट हाउस वर जाऊन परप्रांतीय सुपरवायझरला चांगला धडा शिकवला. व स्थानिक कामगारांना न्याय मिळवून दिला. परप्रांतीय सुपरवायझरला स्थानिक मराठी कामगारांची माफी मागायला लावली. यासंदर्भात बोलताना मनसे शहराध्यक्ष निखिल भोसले म्हणाले की येथून पुढे अशा घटना घडणार नाही व मराठी कामगार तसेच मराठी माणसावर अन्याय झाला तर कुणाचीही गय केली जाणार नाही. असा प्रकार पुन्हा घडला तर त्याला मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल. स्थानिकांवर अन्याय सहन केला जाणार नाही. अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळवून दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे सर्वत्र कौतुक होत आहे.






