ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंती दिन शिक्षक दिन म्हणून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि शिपायांच्या भूमिकेतून शाळा सुरळीत चालवली. विद्यार्थी मुख्याध्यापक आदित्य दराडे आणि विद्यार्थी पर्यवेक्षिका श्रावणी हेळकर यांनी शाळेचे सुत्र हाती घेत पहिल्या पाच तासिकांचे उत्तम नियोजन केले. विद्यार्थ्यांनी अध्यापनाची पूर्ण तयारी करून वर्गात शिकवले, तर शिपायांच्या भूमिकेत असलेल्या विद्यार्थ्यांनी जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडल्या.

 

दुपारनंतर शिक्षक दिनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपक्रमशील सचिव श्री. संतोष खांडगे साहेब, प्रमुख पाहुणे व्याख्याते श्री. विवेक गुरव, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पांडुरंग पोटे, पर्यवेक्षिका सौ. रेखा भेगडे, तसेच विद्यार्थी प्रमुख आदित्य दराडे व श्रावणी हेळकर यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा व डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले.

 

कार्यक्रमात दहावीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या गुरुवंदना गीताने वातावरण भारावून गेले. त्यानंतर पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांवरील काव्यपठण व भाषणे सादर करून शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. दहावीतील विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून घेतलेल्या अनुभवांचे मनोगत कथन केले.

Advertisement

 

संस्थेचे सचिव संतोष खांडगे साहेब यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना “आई-वडील, गुरुजन, ग्रंथ व निसर्ग यांच्याकडून चांगले गुण आत्मसात करा” असा मोलाचा संदेश दिला.

विद्यालयातील ज्येष्ठ अध्यापिका सौ. आशा आवटे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवनचरित्र सविस्तर कथन केले.

सौ. अनिता नागपुरे यांनी प्रमुख पाहुणे विवेक गुरव यांचा परिचय करून दिला.

गुरव सरांनी विद्यार्थ्यांना प्रभावी वक्ता होण्यासाठी आवश्यक गुणांविषयी मार्गदर्शन केले.

सौ. सुवर्णा काळडोके यांनी शाळेच्या विकासाचा आढावा सादर केला.

तसेच मुख्याध्यापक श्री. पांडुरंग पोटे यांनी शिक्षकांचे जीवनातील महत्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना जागरूक राहण्याचे आवाहन केले.

 

शेवटी दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन गौरव केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी हेळकर आणि देवयानी दाभाडे यांनी केले.

आभार प्रदर्शन कु. अंजली गराडे हिने मानले.

 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला आणि कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

 

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page