वहानगाव येथील श्री भैरवनाथ विद्यालयात आरोग्य शिबिराचे आयोजन
वहानगाव :

बुधवार, ३ सप्टेंबर व गुरुवार, ४ सप्टेंबर २०२५ रोजी श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, वहानगाव येथे टाटा पावर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट व निरामय हेल्थ फाउंडेशन यांच्या वतीने आरोग्य प्रकल्पांतर्गत दोन दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांची सविस्तर आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांना आवश्यक औषधे व गोळ्या देण्यात आल्या. तसेच संतुलित आहार, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य संवर्धन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून डॉ. क्षमा निकम, डॉ. आदित्य कांबळी, डॉ. सरोज काळे (निरामय हेल्थ फाउंडेशन), सविता कामथ मॅडम, सौ. नलिनी पिंगळे, श्री. राजेश्वर दुपारे, श्री. प्रीतम कुमार (टाटा पावर CSR), सौ. शुभांगी दरेकर (टाटा पावर अनुघ धागा मॅनेजर), सौ. दीप्ती मथुरे (निरामय फाउंडेशन प्रोग्रॅम ऑफिसर), श्री. स्वप्नील कदम, श्री. सुभाष केदारे, सौ. त्रिवेणी जाधव (निरामय फाउंडेशन) हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विनय नंदकुमार कसबे यांनी केले. सहशिक्षक श्री. धन्यकुमार पाटील, श्री. धनकुमार शिंदे, कु. दिव्या तनपुरे व कु. साक्षी गोगावले यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
सहशिक्षक श्री. संतोष बारसकर यांनी आभार मानले.
या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.






