*हभप दत्तोबा महाराज शेटे यांचे पुण्यस्मरण निमित्त विविध कार्यक्रम*
मावळ :
वै.मृदुंगमनी हभप दत्तोबा महाराज शेटे यांचे १८ वे पुण्यस्मरण आणि गुरुपौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रमाचे बुधवार दि.०६.०८.२०२५ रोजी आयोजन केलेले आहे. सकाळी ९वा.श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजा दुपारी १२वा.पुण्यस्मरण विधी सायंकाळी ०३वा.ते०५ वा.किर्तन आणि सांप्रदायिक क्षेत्रात,शैक्षणिक क्षेत्रात आदी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणीजनांचा पुरस्कार देवून सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजितक भजन सम्राट हभप श्री नंदकुमार दत्तोबा शेटे महाराज आहेत.तरी किर्तनकार,प्रवचनकार,गायनाचार्य,मृदंगाचार्य,आळंदी,पंढरीचे वारकरी,राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते यांनी आवर्जून उपस्थित रहावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
चौकट-यावेळी वारकरी भूषण पुरस्कार,गुणवंत गुरुजन पुरस्कार,तसेच विषेश सत्कार करण्यात येणार आहेत.






