*तळेगाव येथे शिक्षक कार्यशाळा संपन्न*
तळेगाव दाभाडे :
मावळ तालुक्यातील शिक्षक कार्यशाळा ॲड.पु. वा. परांजपे विद्यालयांमध्ये नुकतीच रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने घेण्यात आली.
अशा प्रकारची तंत्रज्ञानावर आणि नवनवीन डिजिटल साक्षरतेबाबत मावळ तालुक्यातील पहिली कार्यशाळा रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी ने घेतली असे पंचायत समिती मावळ चे
गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी रोटरी क्लब घेत
असलेल्या उपक्रमाबद्दल प्रास्ताविक मनोगतातून माहिती दिली. डिजिटल लिटरेसी चॅट जी पी टी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या महत्त्वपूर्ण विषयावर प्रशिक्षण देण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून लिटरेसी जिल्हा डायरेक्टर संतोष परदेशी, सहाय्यक डायरेक्टर कमलजी कौर, झोनल चेअर पर्सन शामल मराठे, प्रकल्प प्रमुख लिटरसी जिल्हा झोनलचे चेअर पर्सन संदीप मगर, एमकेसीएलआरएलसीचे समन्वय विश्वजीत उत्तरवार, अमित खापरे, लोटस कॉम्प्युटरचे सहाय्यक सर्व शिक्षक शंकर हदिमणी, अजय पाटील,दशरथ जांभुळकर सचिन कोळवणकर आदी उपस्थित होते डिजिटल साक्षरता शिक्षकांसाठी विविध नवनवीन तंत्रज्ञान अतिशय उपयोगी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख व प्रत्येक केंद्रातील तंत्रस्नेही शिक्षक यांच्यासाठी अतिशय उपयुक्त गुगल फॉर्म सीट,पी पी टी व ऑनलाइन दर्जेदार प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शनपर तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली तालुकास्तरीय पहिली कार्यशाळा घेतल्याबद्दल रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसी संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी रोटरी टीमचं कौतुक केले. सूत्रसंचालन रोव दशरथ जांभूळकर यांनी केले तर आभार पांडुरंग पोटे यांनी मानले.