स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये प्राथमिक विभागाचा उत्साहपूर्ण आनंद मेळावा
तळेगाव दाभाडे
श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल येथे प्राथमिक विभागासाठी अत्यंत आनंदी, रंगतदार व उपक्रमशील असा आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, आत्मविश्वास, व्यवहारज्ञान व संघभावना विकसित व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली.या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री मिलिंद शेलार सर, शालेय समिती अध्यक्षा सौ रजनीगंधा खांडगे मॅडम, श्री योगेश कुंभार सर तसेच सौ कल्पना शिरसाठ मॅडम (PTM member) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांची ओळख विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ रेणू शर्मा मॅडम यांनी करून दिली.
याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री मिलिंद शेलार सर यांनी आपल्या मनोगतातून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, आत्मविश्वास व व्यवहारिक कौशल्ये विकसित होतात, असे मत व्यक्त केले. तसेच शालेय समिती अध्यक्षा सौ. रजनीगंधा खांडगे मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे विशेष कौतुक करत पालकांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम अधिक यशस्वी झाल्याचे नमूद केले.
आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन विविध आकर्षक स्टॉल्स उभारले होते. यामध्ये खाऊ गल्ली, विविध खेळांचे स्टॉल, टॅटू, मेहंदी आदी उपक्रमांचा समावेश होता. प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध मांडणी, उत्साही सेवा व आनंदी सहभाग पाहायला मिळाला. पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मनापासून प्रोत्साहन दिले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन नियोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रेणू शर्मा व पर्यवेक्षक श्री सिद्धेश्वर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा आनंद मेळावा यशस्वी व संस्मरणीय ठरला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यालयातील शिक्षिका सुजाता गुंजाळ यांनी केले. श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष खांडगे सर, संस्थेचे उपाध्यक्ष दादासाहेब उऱ्हे ,शालेय समिती अध्यक्षा सौ रजनीगंधा खांडगे , कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे , सचिव श्री मिलिंद शेलार यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.






