स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
तळेगाव दाभाडे
श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. शैक्षणिक, क्रीडा तसेच सहशालेय उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास शालेय समिती अध्यक्षा सौ. रजनीगंधा खांडगे मॅडम, खजिनदार श्री सुदामजी दाभाडे सर, शालेय समिती उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई जोशी मॅडम, सल्लागार शबनम खान मॅडम हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली.प्रमुख पाहुण्यांची ओळख विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रेणू शर्मा मॅडम यांनी करून दिली. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या सुमधुर स्वागत गीताने झाली, ज्यामुळे संपूर्ण सभागृह आनंदमय झाले.
याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रेणू शर्मा मॅडम, पर्यवेक्षक श्री सिद्धेश्वर सोनवणे सर, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी खजिनदार श्री सुदामजी दाभाडे सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना उद्देशून, मेहनत, शिस्त व सातत्य हे यशाचे खरे गमक असून अपयशाला न घाबरता आत्मविश्वासाने पुढे जावे, असे मौलिक मार्गदर्शन केले.
शालेय समिती उपाध्यक्षा जयश्रीताई जोशी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजचे विद्यार्थी हे उद्याचे सक्षम नागरिक असून शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त व नैतिक मूल्यांची जोपासना करणे तितकेच आवश्यक आहे.
सल्लागार शबनम मॅडम यांनी आपल्या प्रेरणादायी मनोगतातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
शालेय समिती अध्यक्षा सौ. रजनीगंधा खांडगे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सदैव प्रयत्नशील असून पालक, शिक्षक व विद्यार्थी यांचा समन्वयच शाळेची खरी ताकद आहे, असे सांगितले. त्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यालयाच्या शिक्षिका सौ. प्रतिभा शिरसाठ मॅडम व श्री सचिन झेंडे सर यांनी केले.
याप्रसंगी श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष खांडगे सर, उपाध्यक्ष श्री दादासाहेब उऱ्हे, कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे, सचिव श्री मिलिंद शेलार यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.






