मोफत मोतीबिंदू चेकअप व शस्त्रक्रिया शिबिर
तळेगाव दाभाडे :
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व मायमर मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदूचे चेकप व मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया शिबिर तसेच इतर रोगनिदान चाचण्या रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 2 या वेळात घेण्यात येणार आहे.
तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले असून शिबिराचे उद्घाटन डॉक्टर सुचित्रा नांगरे, डॉक्टर महेश दर्पणगिरी, पत्रकार सौ रेखाताई भेगडे, असिस्टंट गव्हर्नर रो अजित वाळुंज व डिस्टिक डायरेक्टर रो सुबोध मालपाणी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे.
या निमित्ताने कर्तव्यदक्ष नागरिक हा पुरस्कार मा श्री सुरेश शिंदे यांना देण्यात येणार आहे.
या वेळी रोटरी कम्युनिटी कॉर्प्स ( आरसीसी )आशा वर्कर्स तळेगाव दाभाडे सिटीचा शुभारंभ होणार आहे.
रोटरी कम्युनिटी कॉर्प्स ( आरसीसी )आशा वर्कर्स तळेगाव दाभाडे सिटीच्या
अध्यक्षपदी सौ अनिता सुनील भेगडे यांची निवड करण्यात आलेली आहे.उपाध्यक्षपदी मंदाकिनी साळवे तर सचिव पदी वैशाली मेठाळ आणि एडमिन डायरेक्टर शालिनी रणभारे तर सल्लागारपदी रो संतोष परदेशी यांची निवड करण्यात आली आहे.
श्री तळेगाव दाभाडे शहर व पंचक्रोशीतील नागरिकांनी जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष रो किरण ओसवाल, प्रकल्प प्रमुख असिस्टंट गव्हर्नर रो दीपक फल्ले, सह प्रकल्प प्रमुख रो विनोद राठोड, मेडिकल डायरेक्टर रो सौरभ मेहता यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क साधावा 9975621212 व 9420862808