मोशीत मोफत आरोग्य – नेत्र तपासणी – चष्मे वाटप शिबीर उत्साहात     

आळंदी : मराठी पत्रकार परिषद मुंबई वर्धापन दिना निमित्त राज्य व पुणे जिल्हा संघाचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी केलेल्या सूचना प्रमाणे मोशीत मोफत आरोग्य – नेत्र तपासणी – चष्मे वाटप शिबीर हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड तालुका यांचे माध्यमातून अंतर्गत पत्रकार आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड तालुका यांचे माध्यमातून तसेच स्वास्थ्य क्लिनिकचे डॉ. नीलेश जगदाळे यांचे तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वास्थ्य क्लिनिकचे संचालक स्वास्थ्य डाॅ. निलेश जगदाळे, अ‍ॅडमिन सुषमा परकाळे, नर्सिंग इन्चार्ज आकांक्षा गडकर, स्वास्थ्यम् मेडिकल व सोशल फाउंडेशन चेअरमन मच्छिंद्र जगदाळे, सूर्या ऑप्टिशियनचे खुशांत त्रिवेदी, ईश्वर मेदगे यांचा सत्कार करण्यात आला. नेत्र तज्ज्ञ सूर्या ऑप्टिशियनचे यांचे माध्यमातून आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांचे वतीने मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप करीत पत्रकार आरोग्य दिन उपक्रम मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या निर्देशा नुसार व जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

या वेळी संयोजक अर्जुन मेदनकर, गौतम पाटोळे, गोविंद ठाकूर पाटील, अमर गायकवाड, सोमनाथ बेंडाले, अनिल जोगदंड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी स्वास्थ्य क्लिनिकचे डॉ. निलेश जगदाळे, सूर्या ऑप्टिशियनचे खुशांत त्रिवेदी, आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण, ईश्वर मेदगे, सुषमा जगदाळे विशेष सहकार्याने आरोग्य तपासणीस सहकार्य केल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या शिबिरात पत्रकार, नातेवाईक, मित्र परिवार, नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, सेवा सल्ला, नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

Advertisement

आरोग्यदीप प्रकल्पाचा रुग्णाणी लाभ घ्यावा : डॉ.निलेश जगदाळे

स्वास्थ्य: स्वास्थ्यम् मेडिकल अँड सोशल फाउंडेशन अंतर्गत आळंदी येथे चालु असलेल्या आरोग्यदीप ओपीडी मार्फत रूग्णांना रक्त,लघवी व इतर लॅब तपासणीवर ३० टक्के सवलत देण्यात येत असल्याचे डॉ. निलेश जगदाळे यांनी सांगितले. स्वास्थ्यम् मेडिकल व सोशल फाउंडेशन चेअरमन मच्छिंद्र जगदाळे

यांचे माध्यमातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदीर, भक्त निवास येथे सोमवार ते शुक्रवार सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत भाविक, वारकरी यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते. स्वास्थ्य: स्वास्थ्यम् मेडिकल अँड सोशल फाउंडेशन अंतर्गत आळंदीत सुरु असलेल्या “आरोग्यदिप” मोफत ओपीडी आणि स्वास्थ्य क्लिनिक, मोशी यांच्या संयुक्त विद्यमानाने पत्रकारांसह नातेवाईक, मित्र परिवार यांचेसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरास आळंदी, मोशी, तसेच खेड तालुक्यातील पत्रकारांनी प्रतिसाद देत सहभागी झाले. आरोग्यदीप प्रकल्पाचा गरजू रुग्ण यांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. निलेश जगदाळे यांनी केले. या वेळी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी नेहमी पत्रकार बांधवांच्या पाठीशी कायम राहू अशा ग्वाही आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी दिली. शिबिराच्या आयोजनासाठी स्वास्थ्य क्लिनिक डॉ. निलेश जगदाळे मोशी, चेअरमन स्वास्थ्यम् मेडिकल अँड सोशल फौंडेशन मच्छिन्द्र जगदाळे, संयोजक अर्जुन मेदनकर यांनी परिश्रम भेटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page