बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा स्तुत्य उपक्रम. कुंडमळा येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दोरखंड बांधण्यात आले
शेलारवाडी:
दरवर्षी पावसाळ्यात इंद्रायणी नदीला मोठा पूर येत असल्याने काही अतिउत्साही पर्यटक सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे कुंडमळा येथे अनेक दुर्घटना घडत असतात.या पार्श्वभूमीवर बजरंग दलाच्या कुंडमळा शाखेच्या वतीने कुंडमळा येथे पर्यटकांच्या सुरक्षेतेसाठी दोरखंड बांधून पर्यटकांसाठी सुरक्षा उपाय योजना करण्यात आल्या आहेत. या उपक्रमासाठी बजरंग दलाचे कुंडमळा शाखेचे कार्यकर्ते सागर भेगडे. मुन्ना आरसुळे. संघपाल लबडे, गौरव भेगडे. अजय राठोड. वेदांत घोगरे व नितेश इंगळे या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. स्थानिक ग्रामस्थ व पर्यावरण प्रेमी नागरिकांनी बजरंग दलाच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे.अशा प्रयत्नामुळे येथे होणाऱ्या अपघाताची संख्या कमी होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. कुंडमळा येथे दरवर्षी रांजणखळगे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. पाण्याचा अंदाज न आल्याने गोंधळून वाहून जातात अशा दुर्घटनेमुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. या घटना टाळण्यासाठी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन संभाव्य धोकादायक भागात दोरखंड बांधले तसेच धोक्याचा इशारा देणारे फलक देखील लावून पर्यटकांना जागरूक करण्याचे कार्य करण्यात आले आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांनी सुरक्षितेची काळजी घ्यावी व अति उत्साही पणा दाखवू नये असे आवाहन बजरंग दलाच्या वतीने करण्यात आले आहे.