मावळ–मुळशीतील मंदिर, बौद्ध विहार, गुरुद्वारा, जैन मंदिर सेवकांसाठी महासेवा शिबिर
कार्ला(मावळ)
मावळ – मुळशी तालुक्यातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा कणा असलेल्या मंदिर, बौद्ध विहार, गुरुद्वारा, जैन मंदिर व्यवस्थेतील सेवकांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम येत्या माघ शु. त्रयोदशी, शनिवार दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला. विश्व हिंदू परिषद, मंदिर एवं अर्चक पुरोहित संपर्क आयाम मावळ मुळशी जिल्हा व श्री ट्रस्ट, कार्ला यांच्या संयुक्त विद्यमाने महासेवा शिबीर आयोजित करण्यात आले, या शिबिरामध्ये तालुक्यातील सर्व मंदिरांतील अर्चक, पुजारी, पुरोहित, बौद्धाचार्य, सेवादार, बाबाजी मंदिर विश्वस्त तसेच मंदिर व्यवस्थापक यांचे एकत्रिकरण केले.
सदर महासेवा शिबिर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत श्री ट्रस्ट, श्री दुर्ग परमेश्वरी मंदिर, कार्ला (मुंबई–पुणे जुना महामार्ग) येथे संपन्न झाले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश मंदिर, बौद्ध विहार, जैन मंदिर, गुरुद्वारा सेवकांचे संघटन बळकट करणे, त्यांच्या आरोग्याची तपासणी करणे तसेच त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय सेवा व कल्याणकारी योजनांमध्ये नोंदणी करणे व सविस्तर माहिती देणे हे होते.
महा सेवा शिबिराचे उद्घाटन व द्वीपप्रज्वलन हे प्रमुख पाहुणे ह.भ.प पुरुषोत्तम महाराज मोरे देहूकर (मा. अध्यक्ष, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू), श्री. अजय शिराळी (प्रमुख व्यवस्थापक, श्री ट्रस्ट कार्ला) श्री.सुरेश साखवळकर (अध्यक्ष, बहुभाषिक ब्राह्मण संघ मावळ) यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात धार्मिक व सामाजिक विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी श्री.संजय मुरदाळे (मुंबई क्षेत्र धार्मिक पुंज प्रमुख) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
मंदिर व्यवस्था मजबूत करण्यासाठी,अर्चक,पुरोहित, जैन पुजारी, बौद्धाचार्य, गुरुद्वारा सेवादार व बाबाजी यांच्या माध्यमातून संस्कृती व समाज जागृत करण्यासाठी व सेवकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यांना सामाजिक-शासकीय प्रवाहाशी जोडण्यासाठी हे महासेवा शिबीर महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास श्री.संजय मुरदाळे (मुंबई क्षेत्र धार्मिक पुंज प्रमुख) यांनी व्यक्त केला आहे.
ह.भ.प पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी विश्व हिंदू परिषद मंदिर एवम अर्चक पुरोहित संपर्क आयाम पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत हे ईश्वरीय कार्य आहे असे म्हटले तसेच आलेल्या सर्व अर्चक पुरोहितांना संबोधन केले.
श्री.अजय शिराळी यांनी श्री ट्रस्ट कार्ले
श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
शिबिरात सहभागी होणाऱ्या पुजारी-पुरोहितांसाठी मोफत आरोग्य तपासणी MIMER मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडे व एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय कामशेत यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते,दैनंदिन सेवेत व्यस्त असलेल्या मंदिर, बौद्ध विहार,जैन मंदिर, गुरुद्वारा सेवकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची संधी मिळण. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना, विमा, निवृत्तीवेतन, आरोग्य सुविधा व इतर लाभांविषयी श्री.धनाजी रामचंद्र शिंदे विश्व हिंदू परिषद प. महा. प्रांत प्रमुख मंदिर एवं अर्चक पुरोहित संपर्क आयाम व श्री.समीर दिवाकर घरोटे (प्रांत सह-प्रमुख) यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.गोविंद अप्पाराव ऐनापार्थी विश्व हिंदू परिषद मावळ – मुळशी जिल्हा प्रमुख (मंदिर एवं अर्चक पुरोहित संपर्क आयाम) यांनी केले,आभार प्रदर्शन श्री.माणिक गवळी (जिल्हा – सेवा विभाग प्रमुख) यांनी मानले, आचार पद्धती कु.आदित्य जाधव (बजरंग दल जिल्हा पूर्ण वेळ कार्यकर्ता).
कार्यक्रमादरम्यान स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले, सर्व उपस्थितांसाठी हा आपुलकीचा व संवादाचा क्षण ठरला आहे.यावेळी विश्व हिंदू परिषद श्री. नितीन वटकर प्रांत सहमंत्री तथा धार्मिक पुंज प्रमुख जिल्हा मंत्री महेंद्र असवले, बजरंग दल जिल्हा संयोजक अमित भेगडे,मातृशक्ती संयोजिका राजश्री वाकचौरे,जिल्हा निधी प्रमुख सचिन शेलार,सत्संग प्रमुख गणेश कवितके,बजरंग दल सह-संयोजक अनिकेत घनवट, दीपक कुलकर्णी, सुशांत जोशी,अभिषेक धोत्रे,श्री सुनील सावळे,स्वप्निल भालेकर,सार्थक आनंदे,यश खेंगरे,रोहिदास मराठे उपस्थित होते,यावेळी १२८ जणांनी लाभ घेतला.






