राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल मावळ तर्फे शिक्षक दिन उत्साहात साजरा
चांदखेड (ता. मावळ) –

राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल मावळच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल चांदखेड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदखेड तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदनवाडी ठाकरवस्ती येथे शिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
हा कार्यक्रम मावळचे लोकप्रिय आमदार मा. सुनील आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व दिव्यांग सेल मावळ तालुक्याच्या महिला अध्यक्षा मा. सौ. ज्योतीताई भरत राजीवडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. शिक्षकांचा सन्मान प्रशस्तीपत्र, भेटवस्तू, झाडाचे रोपटे आणि गुलाबाचे फुल देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळच्या महिला अध्यक्षा मा. सौ. सुवर्णाताई राऊत होत्या. तसेच चांदखेड सरपंच मा. सौ. मीनाताई दत्तात्रय माळी, पाचाणे सरपंच मा. सौ. सुनिताताई मनोज येवले, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मा. श्री. आजिनाथ ओगले, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा भावे आणि चंदनवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विकास रासकर हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व बा. रा. घोलप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सूत्रसंचालन सौ. शुभांगी पवार यांनी केले तर प्रस्तावना श्री. आजिनाथ ओगले यांनी मांडली.
या प्रसंगी मावळ दिव्यांग सेल अध्यक्ष श्री. सुभाष शेडगे, शहर अध्यक्षा सौ. मोहिनी काळे, जिल्हा सरचिटणीस सौ. वैशाली गायकवाड, गाव अध्यक्षा सौ. अश्विनी टेकळे, अल्पसंख्यांक विभाग उपाध्यक्षा फातिमा इनामदार, सामाजिक कार्यकर्ते बाबा कदम, भरत नाना राजीवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात शिक्षकांना समाजातील त्यांच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणारे संदेश देण्यात आले. तीनही शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






