*कोयाळी येथील शाळा परिसरात वृक्षारोपण*
खेड :

डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, आकुर्डी येथील कृषीदूतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कोयाळी, ता. खेड, जि. पुणे या गावात कृषीविषयक जनजागृती केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोयाळीच्या विद्यार्थ्यांनी गावामधून रॅली काढली. या कार्यक्रमांतर्गत कृषीदूत अमरसिंह पाटील, प्रणव गुणावरे, स्वराज खोमणे, समर्थ निंबाळे, निशांत शिंदे, विराजराजे गोरे, आदी सहभागी झाले होते. तसेच, या प्रसंगी कोयाळी गावचे सरपंच विकास भिवरे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद म्हाटे सर आणि विद्यार्थी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. डी. जगताप, उपप्राचार्य डॉ. एस. एन. पाटील आणि कृषी व्यवसाय तज्ज्ञ डॉ. एम .बी. निचित यांनी मार्गदर्शन केले.






