रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्ट – नूतन पदाधिकाऱ्यांचा भव्य पदस्थापना सोहळा
पुणे :

रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टचा २०२५–२६ या रोटरी वर्षासाठीचा पदस्थापना समारंभ दिनांक २९ जून २०२५ रोजी डॉ. नितू मांडके आयएमए हाऊस, टिळक रोड, स्वारगेट येथील संचेती सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी रोटरीयन अलका अमृत ओसवाल आणि सचिवपदी रोटरीयन राहूल शहा यांची अधिकृत पदस्थापना करण्यात आली. यासोबतच नवीन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांचीही निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरीयन मौसमी शाह यांनी तर अतिशय भावपूर्ण नवकार व गणेश वंदना अनेरी राहूल शहा हिने सादर केली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पूर्व प्रांतपाल रोटेरिअन श्री मोहन पालेशा होते. रोटरी जिल्हा ३१३१ चे सध्याचे गव्हर्नर रोटरीयन शीतल शहा, सहायक गव्हर्नर रोटरीयन वर्धमान गांधी, आणि रोटरी जिल्हा ३१३१ चे इतर अनेक मान्यवर अधिकारी उपस्थित होते. क्लबच्या सर्व सदस्यांनी आपुलकीने आणि सहभागातून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

नवीन अध्यक्षा रोटरीयन अल्का ओसवाल यांनी आगामी वर्षासाठी सेवा प्रकल्प, पर्यावरण, सार्वजनिक प्रतिमा, युवा सहभाग यावर आधारित दृष्टीकोन आणि सेवा आराखडा मांडला. सचिव रोटरीयन राहूल शहा यांनी जागतिक पोलिओ निर्मूलनासाठी रोटरीच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाला अनेक नॉन-रोटेरियन उपस्थित होते आणि त्यांनीही सामाजिक कार्यात सहभागी होण्याची तयारी दर्शवली, ही बाब रोटरीच्या Unite for Good या संकल्पनेला खऱ्या अर्थाने न्याय देणारी ठरली.
संपूर्ण कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व प्रेरणादायी होता आणि त्यानंतर रसास्वादपूर्ण स्नेहभोजनाने या सुंदर संध्याकाळची सांगता झाली.






