ॲड.पु.वा.परांजपे विद्या मंदिरला गुणवत्ता संवर्धन अभियानात सलग दुसऱ्यांदा तालुका व जिल्हा पातळीवर विशेष प्राविण्य पुरस्कार प्राप्त

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये पुणे, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातील १६२० पेक्षा जास्त शाळांसाठी राबविण्यात आलेल्या गुणवत्ता संवर्धन अभियानात तालुक्यामध्ये विविध गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळांची* तीनशे गुणांची जिल्हास्तरीय सखोल पुनर्तपासणी करण्यात आली होती .

यामध्ये प्रामुख्याने शाळेतील भौतिक सुविधा, प्रशासन विषयक बाबी, संपूर्णपणे सौर उर्जेवर चालणारी पर्यावरण पूरक शाळा, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून अध्ययन अध्यापन करणारी मावळ तालुक्यातील पहिली संपूर्ण डिजिटल शाळा,शाळेतील विविध विभाग तसेच गुणवत्ता संवर्धनासाठी शाळेने केलेले प्रयत्न , शिक्षक मूल्यमापन इत्यादी निकषांमध्ये शाळेने बाजी मारली . *पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर साहेब व पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. नंदकुमार सागर साहेब* यांनी नुकताच जिल्हास्तरीय निकाल जाहीर केला आहे.यामध्ये नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे संचलित, अॕड्.पु.वा.परांजपे विद्या मंदिराने ५०० ते १००० विद्यार्थी संख्येच्या शाळांमध्ये तालुका व जिल्हा पातळीवर सर्वाधिक गुण मिळवून विशेष प्राविण्य पुरस्कार पटकावून संस्थेच्या व शाळेच्या वैभवात भर टाकली आहे. खरोखरीच ही अतिशय अभिमानाची व कौतुकाची बाब आहे. विजेत्या शाळांचा गौरव समारंभ गणेश कला क्रीडा सभागृह पुणे येथे दि. २३ एप्रिल २०२६ रोजी *महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ.महेश पालकर, शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे,शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर , मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री.प्रसाद गायकवाड ,सचिव श्री.शिवाजी कामठे, कार्याध्यक्ष श्री.राजेश गायकवाड ,शहराध्यक्ष श्री .शिवाजी शिंदे श्री.विठ्ठल माळशिकरे या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला .

Advertisement

ॲड .पु.वा. परांजपे विद्या मंदिर शाळेने गुणवत्ता संवर्धन अभियानात शाळेचे मुख्याध्यापक श्री. पांडुरंग पोटे सर ,पर्यवेक्षिका सौ.रेखा भेगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही वर्षी या अभियानाची प्रमुख जबाबदारी शाळेतील अध्यापिका श्रीम. दीप्ती बारमुख मॅडम, श्री.संपत गोडे सर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी पार पाडली.

अॕड्.पु.वा. परांजपे विद्या मंदिर शाळेने गुणवत्ता संवर्धन अभियानात तालुका व जिल्हास्तरावर मिळविलेल्या यशाबद्दल नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे संस्थेचे अध्यक्ष मा.राज्यमंत्री श्री.संजय तथा बाळा भेगडे ,उपाध्यक्ष श्री.नंदकुमार शेलार, सचिव श्री.संतोष खांडगे , खजिनदार श्री.राजेश म्हस्के, सहसचिव श्री. विनायक अभ्यंकर, शालेय समिती अध्यक्ष श्री.चंद्रकांत शेटे,सर्व संचालक मंडळ*,सर्व आजी-माजी विद्यार्थी, पालक यांच्यावतीने सर्व स्तरांतून मुख्याध्यापक , पर्यवेक्षिका आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंदांचे विशेष कौतुक व अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page