NMMS परीक्षेत तळेगावच्या परांजपे विद्या मंदिरचा जलवा; चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत!, ३९ विद्यार्थी उत्तीर्ण; गुणवंतांना मिळणार ४८ हजारांची शिष्यवृत्ती

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

तळेगाव दाभाडे येथील ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर प्रशालेने NMMS (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) परीक्षेत घवघवीत यश संपादन करत आपली शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

या परीक्षेत विद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

🏆 रोहित पंढरीनाथ जाधव – ८६ गुण (ST – ९३)

🏆 तृप्ती नामदेव सुराशे – १४४ गुण (Open – १४०)

🏆 स्तवन अजय खंडागळे – १४१ गुण (Open – १९३)

🏆 श्रेयस उमेश जगताप – १२६ गुण (Open – EWS – ५१)

विशेष म्हणजे, विद्यालयातील तब्बल ३९ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत दरवर्षी १२ हजार रुपये प्रमाणे चार वर्षांसाठी एकूण ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.

Advertisement

या यशामागे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे सर, पर्यवेक्षिका रेखा भेगडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच वर्गशिक्षिका सुषमा दाते मॅडम यांनी वर्षभर विशेष मेहनत घेतली, तर विषय शिक्षक दीप्ती बारमुख मॅडम आणि कविता पाखरे मॅडम यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे नू.म.वि.प्र. मंडळाचे अध्यक्ष संजय (बाळा) भेगडे, उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, सचिव संतोष खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के, सहसचिव विनायक अभ्यंकर तसेच शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत शेटे यांनी अभिनंदन केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page