“नवोदितांनी आपल्या कुटुंबाचा विचार करून नाट्य आणि सिनेक्षेत्रात पाऊल टाकावं.” सुप्रसिद्ध सिने – नाट्य अभिनेते मोहन जोशी… कलापिनीचा ४८ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न….

SHARE NOW

तळेगाव दाभाडे दि. ११ –

“नाट्य आणि सिनेक्षेत्र चांगलं आहे. पण नवोदितांनी आपल्या कुटुंबाचा विचार करून या क्षेत्रात पाऊल टाकावं. या क्षेत्रात जितकी प्रसिद्धी आणि पैसा मिळतो तितकेच मोह आहेत. त्यामुळे आई – वडिलांचे संस्कार आणि भविष्याचा संपूर्ण विचार करून या क्षेत्रात यावं.” असा वडिलकीचा सल्ला सुप्रसिद्ध सिने, नाट्य अभिनेते मोहन जोशी यांनी दिला. तळेगाव दाभाडे येथील सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या कलापिनीच्या ४८ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त मोहन जोशी उपस्थित होते. जोशी यांच्या प्रकट मुलाखती मधून त्यांचा कलाप्रवास जाणून घेण्याची संधी रसिकांना मिळाली. कार्यक्रमात मोहन जोशी यांच्या हस्ते वर्धापन दिनानिमित्त कलापिनी गौरव पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे, उपाध्यक्ष अशोक बकरे, खजिनदार श्रीशैल गद्रे, सचिव हेमंत झेंडे, मोहन जोशी यांच्या पत्नी ज्योती जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी सुजाण आणि उत्साही प्रतिसाद दिला.

मोहन जोशी यांनी मुलाखतीमधून त्यांच्या अनेक नाटकांचे, सिनेमांचे किस्से सांगितले. कलापिनीच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीचे त्यांनी कौतुक केले. कलापिनीत चालू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन टीम वर्कमुळेच संस्था यशस्वी वाटचाल करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लेखक आणि दिग्दर्शक कलाकाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असतात असे सांगताना जोशी म्हणाले, “मी दिग्दर्शकाचा नट आहे. अॅडीशन घेतली तरी मी सहकलाकार आणि दिग्दर्शकाला विचारून घेत असे. तसच लेखक जेव्हा नाटक लिहितो तेव्हा त्यानी काहीतरी विचार केलेला असतो. त्यामुळे कलाकारांनी आपलं डोकं वापरून मनानी बदल करू नये. स्टेजवर काम करणाऱ्या कलाकारांइतकंच बॅकस्टेजच्या कलाकारांना महत्त्व आहे. कोणतीही कलाकृती एकट्या कलाकाराची नसते.”

मोहन जोशी यांच्या हस्ते कलापिनी प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कलापिनी गीताने झाली. दिनेश कुलकर्णी यांच्या रचनेला विनायक लिमये यांनी संगीत दिले होते. स्वप्नील झळकी, अनिकेत जोशी, तेजस जोशी, देवयानी लेले, डॉ. प्राची पांडे, मैथीली देशपांडे – शिंदे यांनी गीत सादर केले.

Advertisement

मोहन जोशी यांच्या हस्ते कलापिनी गौरव पुरस्कार वितरण झाले. यामध्ये पुढील पुरस्कारार्थींना गौरविण्यात आले.

बालभवन सितारा – देवांश शिळीमकर, अबीर पटवर्धन, कुमार भवन सितारा – ओवी पाचलग, उत्कृष्ट बाल कलाकार – मुग्धा भालशंकर, कै.पुष्पलता अरोरा पुरस्कार – माधवी एरंडे, स्वास्थ्य योग गौरव पुरस्कार – वैशाली लिमये, पांडुरंग देशमुख, कै. गोदावरी भाभी व कैलासवासी विष्णू भाई शहा स्मृती सेवाभावी पुरस्कार – दीपक जयवंत, सौ दीप्ती जयवंत, कै.सुनीता घाणेकर कला गौरव पुरस्कार – ज्योती ढमाले, महिला मंच सखी पुरस्कार – दिपाली जोशी, महिला मंच प्रोत्साहन पुरस्कार – रूपाली पाटणकर, चतुरस्त्र महिला पुरस्कार – मीरा कोन्नुर , चतुरस्त्र युवक कलाकार – विपुल परदेशी, अष्टपैलू ” युवक” कलाकार – संदीप मनवरे, रंगकर्मी पुरस्कार – सागर यादव, श्री.सुबोध भावे पुरस्कृत.कै.विजय तेंडुलकर स्मृती प्रोत्साहन लेखन पुरस्कार – डॉ.मीनल कुलकर्णी, श्री.सुबोध भावे पुरस्कृत कै.सतीश तारे स्मृती प्रोत्साहन कलाकार पुरस्कार – चेतन पंडित, कै. हेमंत तुंगार स्मृती युवा गौरव पुरस्कार – विराज सवाई.

कै. हेमंत तुंगार स्मृती युवा गौरव पुरस्कार विजेते विराज सवाई यांनी कलापिनीमध्ये केलेल्या कामाचा अन्य ठिकाणी कसा उपयोग होतो हे सांगताना कलापिनीचे आभार मानले. मनाला आनंद, उर्जा आणि प्रोत्साहन देणारे काम कलापिनीत करता येते असे ते म्हणाले. आजूबाजूला चालू असलेल्या नकारात्मक वातावरणात कलापिनी सकारात्मक उर्जा देते. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असेही ते म्हणाले.

लीना परगी, ऋचा पोंक्षे आणि चैतन्य कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अभ्यंकर यांनी स्वागत केले. डॉ. परांजपे यांनी प्रास्ताविक केले. वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा सहस्त्रबुद्धे यांनी घेतला. हेमंत झेंडे यांनी आभार मानले. डॉ. विनया केसकर आणि विराज सवाई यांनी मोहन जोशी यांच्याशी प्रकट संवाद साधला. कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखेच्या वतीने प्रमुख कार्यवाह विश्वास देशपांडे व सचिव संजय वाडेकर यांनी मोहन जोशी यांचा सत्कार केला.

प्रतिक मेहता, चेतन पंडित, अभिलाष भवार, विनायक भालेराव, चेतन शहा, अनघा बुरसे, श्रीपाद बुरसे, दिपाली जोशी,राखी भालेराव, ज्योती ढमाले, सोनाली पडळकर, विद्या अडसूळ, नीता धोपाटे, जान्हवी पावसकर, केतकी लिमये, विशाखा देशमुख, दिप्ती आठवले, अपूर्वा गुरव, सुप्रिया खानोलकर आदी कलापिनीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page