पहाटे ३ वाजता नगरसेवक सागर बोडके मैदानात; रखडलेले पाइपलाइन काम अखेर पूर्ण..!
तळेगाव दाभाडे : गेल्या काही दिवसांपासून पाइपलाइनच्या रखडलेल्या कामामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
या समस्येचे गांभीर्य ओळखून पाणी समितीचे सदस्य नगरसेवक Sagar Bodke यांनी स्वतः या कामात लक्ष घातले. केवळ अधिकाऱ्यांना सूचना देऊन न थांबता, आज पहाटे ३ वाजता संपूर्ण शहर झोपेत असताना त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून सुरू असलेल्या पाइपलाइन कामाची पाहणी केली.
सागर बोडके यांच्या थेट उपस्थितीमुळे आणि सततच्या मार्गदर्शनामुळे कर्मचाऱ्यांनी कामाचा वेग वाढवला. अखेर पहाटेच हे प्रलंबित काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून पाणीपुरवठा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या तत्परतेबद्दल नागरिकांकडून नगरसेवक सागर बोडके यांचे कौतुक करण्यात येत आहे.






