मावळ लोकसभा खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्याकडून शिंदे घाटेवाडी या ठिकाणी सौर ऊर्जा पंप बसविला.
आंदर मावळ :
शिंदे घाटेवाडी ग्रामस्थ तसेच शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांनी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्याकडे निवेदन दिले होते की, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शिंदे घाटेवाडी या ठिकाणी वारंवार वीज जाते त्यामुळे विजेअभावी ग्रामस्थांना तसेच पोल्ट्री व शेतकरी इतर व्यवसायिक यांना ग्रामपंचायत मार्फत होणारा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. गावकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी शिंदे घाटेवाडी या ठिकाणी सौर ऊर्जा पंप बसवून दिला. त्यामुळे आता वीज नसली तरी नळाला पाणी येणार आहे.
गावकऱ्यांचे मुख्य समस्या सोडवल्यामुळे सर्व ग्रामस्थांनी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे आभार मानले.