भोसरीत ओळख श्री ज्ञानेश्वरीची उपक्रमास प्रारंभ संत साई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ४०० मुलांना हरिपाठाचे वाटप

आळंदी :

भोसरी येथील संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरीची ” या शालेय मुलांसाठी असलेल्या संस्कारक्षम उपक्रमाचा प्रारंभ संत पूजन, दीपप्रज्वलनाने हरिनाम गजरात झाला. या प्रसंगी शालेय मुलांनी गीतेचा १२ वा अध्याय सामुहिक मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून गात उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी ४०० मुलांना हरिपाठाचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाशतात्या काळे, संस्थापक अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर, संस्थेच्या संचालिका सुनिता ढवळेश्वर, उपमुख्याध्यापिका रूपाली खोल्लम, शुभांगी सुतार, पूजा पावटेकर, काशिनाथ कतनाळी, प्रमोद शिंदे, संस्थेचे शिक्षक पालक संघ प्रतिनिधी इंजिनिअर अजित मेदनकर समन्वयक अर्जुन मेदनकर, शाळेतील शिक्षक वृंद, पालक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ओळख श्री ज्ञानेश्वरी ची या उपक्रमात कार्यक्रमाची सविस्तर माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाशतात्या काळे यांनी देत शालेय मुलांसह उपस्थितांशी सुसंवाद साधला. या उपक्रमाची गरज यावर त्यांनी विवेचन दिले. मुले सुसंस्कृत आणि संस्कारक्षम व्हावीत यासाठी शाळा आणि ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार यांचे वतीने आळंदी देवस्थान, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आणि पत्रकार संघ यांचे माध्यमातून हा उपक्रम सुरु असून माऊली हे सेवाकार्य करून घेत असल्याचे सांगत आमचे यात काहीही योगदान नसल्याचे सांगत माऊलींचे साहित्य सर्वसामान्यांन पर्यंत घेऊन जाण्याचे उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. शालेय मुले आणि उपस्थितांना विविध दाखले देत त्यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून मार्गदर्शन करीत संवाद साधला. यावेळी माऊलींचे शब्दाचा डबा अर्थात हरिपाठ, ज्ञानेश्वरी आदी साहित्याचा शब्दाचा डबा हि मिठाई आणि आईने घरून दिलेला धष्ट्पुष्ठ होण्यासाठी घरचा अन्नाचा डबा सेवन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

इंजिनीयर अजित मेदनकर म्हणाले, भगवत गीता आणि ज्ञानेश्वरी चा धागा जोडून कर्म, मनाचे स्वास्थ्य, कृतज्ञता आणि मानसिक, बौद्धिक, शारीरिक विकासा बरोबर आताच्या काळात त्याला तत्त्वज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. शाळेच्या विविध सांस्कृतिक उपक्रमा विषयी त्यांनी सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले. मनशक्तीच्या माध्यमातून शाळेची मुले संस्कार प्रकल्प राबवित आहेत. संत साई स्कूल हे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून संस्कार पीठ असल्याचे आवर्जून त्यांनी सांगितले. पसायदानाचे महत्व सांगितले. एकादशीच्या पुण्य पावन मुहूर्तावर झालेला कार्यक्रम खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांवर माऊलींची कृपा केल्या शिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले.

यावेळी अध्यक्षीय मनोगतातून संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर म्हणाले, संस्कारक्षम मुले घडविण्याचे उपक्रमांचे शाळेत स्वागत केले जाते. अध्यात्मिक उपक्रम शाळेत राबविले जातात. आल्या उपक्रमाचे स्वागत आणि असे उपक्रम प्रभावी पणे राबविला जाईल अशी ग्वाही शिवलिंग ढवळेश्वर यांनी दिली. प्रशाळेतील उपक्रम हे नेहमी संस्कारक्षम मुले घडावीत यासाठी प्रभावीपणे राबविले जातात. शालेय अभ्यासक्रमासह मुलांना अध्यात्मिक बैठक देखील आहे. मनशक्ती केंद्रातील उपक्रम राबवून मुले अधिक निरोगी कसे राहतील, संस्कारक्षम कसे होतील यावर मार्गदर्शन केले जाते. मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन मुलांचा सर्वांगीण विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे. दर्जेदार शिक्षण दिले जात असल्याने नावलौकीक प्राप्त शाळा ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

यावेळी उपस्थित सुमारे ४०० मुलांना हरिपाठ वाटप करण्यात आले. प्रशालेस माऊलींची प्रतिमा भेट देऊन पूजन करण्यात आले. यावेळी संस्तेचे अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर यांचे कडे श्री ज्ञानेश्वर पारायण प्रति, सार्थ श्री ज्ञानेश्वरी संस्तेसाठी हरिनाम गजरात प्रकाश काळे यांचे हस्ते सुपूर्त करण्यात आल्या. पसायदान गायनाने उपक्रमाची सांगता हरिनाम गजरात झाली. प्रास्ताविक शुभांगी सुतार यांनी केले. आभार पूजा पावटेकर यांनी मानले.भोसरीत ओळख श्री ज्ञानेश्वरीची उपक्रमास प्रारंभ
संत साई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ४०० मुलांना हरिपाठाचे वाटप
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : भोसरी येथील संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरीची ” या शालेय मुलांसाठी असलेल्या संस्कारक्षम उपक्रमाचा प्रारंभ संत पूजन, दीपप्रज्वलनाने हरिनाम गजरात झाला. या प्रसंगी शालेय मुलांनी गीतेचा १२ वा अध्याय सामुहिक मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून गात उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी ४०० मुलांना हरिपाठाचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाशतात्या काळे, संस्थापक अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर, संस्थेच्या संचालिका सुनिता ढवळेश्वर, उपमुख्याध्यापिका रूपाली खोल्लम, शुभांगी सुतार, पूजा पावटेकर, काशिनाथ कतनाळी, प्रमोद शिंदे, संस्थेचे शिक्षक पालक संघ प्रतिनिधी इंजिनिअर अजित मेदनकर समन्वयक अर्जुन मेदनकर, शाळेतील शिक्षक वृंद, पालक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ओळख श्री ज्ञानेश्वरी ची या उपक्रमात कार्यक्रमाची सविस्तर माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाशतात्या काळे यांनी देत शालेय मुलांसह उपस्थितांशी सुसंवाद साधला. या उपक्रमाची गरज यावर त्यांनी विवेचन दिले. मुले सुसंस्कृत आणि संस्कारक्षम व्हावीत यासाठी शाळा आणि ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार यांचे वतीने आळंदी देवस्थान, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आणि पत्रकार संघ यांचे माध्यमातून हा उपक्रम सुरु असून माऊली हे सेवाकार्य करून घेत असल्याचे सांगत आमचे यात काहीही योगदान नसल्याचे सांगत माऊलींचे साहित्य सर्वसामान्यांन पर्यंत घेऊन जाण्याचे उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. शालेय मुले आणि उपस्थितांना विविध दाखले देत त्यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून मार्गदर्शन करीत संवाद साधला. यावेळी माऊलींचे शब्दाचा डबा अर्थात हरिपाठ, ज्ञानेश्वरी आदी साहित्याचा शब्दाचा डबा हि मिठाई आणि आईने घरून दिलेला धष्ट्पुष्ठ होण्यासाठी घरचा अन्नाचा डबा सेवन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
इंजिनीयर अजित मेदनकर म्हणाले, भगवत गीता आणि ज्ञानेश्वरी चा धागा जोडून कर्म, मनाचे स्वास्थ्य, कृतज्ञता आणि मानसिक, बौद्धिक, शारीरिक विकासा बरोबर आताच्या काळात त्याला तत्त्वज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. शाळेच्या विविध सांस्कृतिक उपक्रमा विषयी त्यांनी सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले. मनशक्तीच्या माध्यमातून शाळेची मुले संस्कार प्रकल्प राबवित आहेत. संत साई स्कूल हे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून संस्कार पीठ असल्याचे आवर्जून त्यांनी सांगितले. पसायदानाचे महत्व सांगितले. एकादशीच्या पुण्य पावन मुहूर्तावर झालेला कार्यक्रम खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांवर माऊलींची कृपा केल्या शिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्षीय मनोगतातून संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर म्हणाले, संस्कारक्षम मुले घडविण्याचे उपक्रमांचे शाळेत स्वागत केले जाते. अध्यात्मिक उपक्रम शाळेत राबविले जातात. आल्या उपक्रमाचे स्वागत आणि असे उपक्रम प्रभावी पणे राबविला जाईल अशी ग्वाही शिवलिंग ढवळेश्वर यांनी दिली. प्रशाळेतील उपक्रम हे नेहमी संस्कारक्षम मुले घडावीत यासाठी प्रभावीपणे राबविले जातात. शालेय अभ्यासक्रमासह मुलांना अध्यात्मिक बैठक देखील आहे. मनशक्ती केंद्रातील उपक्रम राबवून मुले अधिक निरोगी कसे राहतील, संस्कारक्षम कसे होतील यावर मार्गदर्शन केले जाते. मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन मुलांचा सर्वांगीण विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे. दर्जेदार शिक्षण दिले जात असल्याने नावलौकीक प्राप्त शाळा ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित सुमारे ४०० मुलांना हरिपाठ वाटप करण्यात आले. प्रशालेस माऊलींची प्रतिमा भेट देऊन पूजन करण्यात आले. यावेळी संस्तेचे अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर यांचे कडे श्री ज्ञानेश्वर पारायण प्रति, सार्थ श्री ज्ञानेश्वरी संस्तेसाठी हरिनाम गजरात प्रकाश काळे यांचे हस्ते सुपूर्त करण्यात आल्या. पसायदान गायनाने उपक्रमाची सांगता हरिनाम गजरात झाली. प्रास्ताविक शुभांगी सुतार यांनी केले. आभार पूजा पावटेकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page