*कार्ला येथे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न*
कार्ला :
कार्ला येथील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ संपन्न झाला असुन
आत्मविश्वासाच्या जोरावर परीक्षेला सामोरे जावे प्रयत्न केले तर अशक्य असे काही नाही त्यासाठी प्रबळ आत्मविश्वास हवा तसेच तुमच्या स्वतःच्या अनुभवांना व विचारांना गती द्या स्वताची आवड कशात आहे ते ओळखुन प्रयत्न करा कष्ट करण्याची तयारी ठेवून अभ्यास करा असे मत संचालक सोनबा गोपाळे यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची असलेल्या बारावी व दहावी च्या शालांत परीक्षा येत्या काही दिवसात सुरू होत असून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध शाळांमध्ये शुभेच्छा आणि निरोप समारंभ संपन्न होत असून कार्ला येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या श्री एकविरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स च्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनी आणि उपस्थित मान्यवरांनी येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गोपाळे बोलत होते.
यावेळी संस्थेचे संचालक महेशभाई शहा, कार्ला ग्रामपंचायत माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किरण हुलावळे, डॉक्टर धनंजय काळे, ग्रामपंचायत सदस्या उज्वला गायकवाड व भारती मोरे ,मुख्याध्यापक संजय वंजारे तसेच इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक संजय
हुलावळे,संगीता खराडे , बारावीचे वर्गशिक्षक सचिन हुलावळे, गणित शिक्षक मच्छिंद्र बारवकर यांनी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी इयत्ता दहावी व बारावी तसेच संजीवनी क्लिनीकचे डॉक्टर धनंजय काळे यांच्या सहकार्यातून शाळेसाठी अॉर्केस्ट सिस्टीम व भिंतीवरील चार घड्याळे देण्यात आली.
कार्यक्रमाचे संयोजन इयत्ता अकरावीच्या वर्गशिक्षिका काजल गायकवाड इयत्ता नववीच्या वर्गशिक्षिका अलका आडकर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववी व अकरावीच्या वर्गाने केले होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक संजय वंजारे यांनी तर सूत्रसंचालन ईश्वरी हुलावळे व दिव्या गायकवाड यांनी केले तर आभार अलका आडकर यांनी मानले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय भेगडे सचिव संतोष खांडगे उपाध्यक्ष गणेश खांडगे खजिनदार राजेश म्हस्के सहसचिव नंदकुमार शेलार यांनी देखील शुभेच्छा दिल्या.