*तळेगाव येथे स्वच्छता अभियान*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथे बुधवारी(दि.०२) महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी, फ्रेंड्स ग्रुप शिक्षक मित्र परिवार, नवक्षितिज मतिमंद संस्था आंबी यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी क्लब अॉफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांच्या मार्गदर्शना नुसार सामाजिक बांधिलकी म्हणून तळेगाव शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तळेगाव स्टेशन चौक ते जिजामाता चौक हा रहदारीचा रस्त्यावर दोन्हीबाजुंनी प्लास्टिक आणि कचरा उचलण्यात आला.यावेळी कचरा रस्त्यावर,इतरत्र टाकू नका,प्लास्टिकचा वापर करु नका,कचरागाड्या मध्ये कचरा टाकण्यात यावा असे आवाहन करण्यात येत होते.यावेळी जवळपास २५ ते ३० पिशव्या भरून कचरा तळेगाव दाभाडे नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आला. सदर स्वच्छता मोहिमेचे उदघाटन तळेगाव वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. सदर स्वच्छता मोहिमेत प्रसंगी रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसी चे अध्यक्ष मिलिंद शेलार,प्रकल्प प्रमुख संदीप मगर,प्रेस फाउंडेशनचे कार्याध्यक्ष जगन्नाथ उर्फ काकासाहेब काळे,सतर्क महाराष्ट्र न्यूज चॕनल संपादक रेखा भेगडे, फ्रेंड्स ग्रुपचे आयोजक सहदेव डोंबे, सुहास धस, नवक्षितीज चे सुनील रहाटे,रोटरीयन संदीप मगर, लक्ष्मण मखर, सुमती निलवे, पांडुरंग खांडवी,सुरेश पाटील, संदीप कांबळे, महादेव भालशंकर, अशोक बारवे ,मोहन बनसोडे , आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन सुहास धस यांनी केले.तळेगाव दाभाडे शहर प्लास्टिक आणि कचरा मुक्त करण्याबाबत मिलिंद शेलार आणि सहदेव डोंबे यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे आभार लक्ष्मण मखर यांनी मानले.या अभियानाची रोटरी क्लब अॉफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी प्रशंसा केली.