रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडी सेवा हेच आमचं कर्तव्य या तत्वावर काम करते – रो. मिलिंद शेलार

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीने समाजातील गरजू वंचित आणि दुर्लक्षित कुटुंबासाठी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे आणि सेवा हेच आमचे कर्तव्य या तत्त्वावर रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसी उपक्रम राबवत असते असे मत रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी व्यक्त केले. ते रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने हॅप्पी फॅमिली किट वाटपाचा उपक्रमात बोलत होते.

 

Advertisement

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने कुसवली वाहनगाव येथील शंकरवाडी (कातकरी वस्तीवर) ___ किट वाटप करण्यात आली. सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून आणि आदिवासी भागातील नागरिकांच्या जीवनमानात थोडासा सकारात्मक बदल घडवण्याच्या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. मान्सून दाखल झाल्यानंतर दुर्गम भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वस्तीवर असणारे आदिवासी बांधवांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आदिवासी बांधवांचे जीवनमान सुसह्य व्हावे यासाठी हा उपक्रम घेतला असून आगामी काळात मान्सूनमुळे होणारी फरफट लक्षात घेऊन रोटरीच्या वतीने आदिवासी बांधवांना हा मदतीचा हात देण्यात आला. यावेळी आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद झळकत होता. या हॅप्पी फॅमिली किटमध्ये कुटुंबासाठी उपयुक्त असणाऱ्या वस्तूंचा समावेश करण्यात आला होता यात शेगडी, सोलार लॅम्प, प्रवासी बॅग, प्रथमोपचार किट, डस्टबिन, टिफिन बॉक्स, साबण, सॅनिटरी पॅड, ताडपत्री व स्टीलच्या पाण्याच्या बाटलीचा समावेश होता.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष रो.संतोष खांडगे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी रोटरी क्लबचे संचालक रो.संदीप मगर, रो.सुवर्णा मते, अलका शेलार, रो.विलास टकले, रो.जगन्नाथ काळे, नारायण चिमटे उपस्थित होते. सूत्रसंचालन बाजीराव सुपे व तेजल मते यांनी केले तर आभार मारुती चिमटे यांनी मानले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page