सिध्दबेटात जागतिक पर्यावरण दिनी अजानवृक्ष पुजा वृक्ष मित्र व्यक्ती – संस्थांचा सन्मान ; वृक्षारोपणास प्रतिसाद

SHARE NOW

आळंदी ( प्रतिनिधी) :

नगरेची रचावी ! जलाशये निर्मावी ! महावने लावावी ! नानाविध !! या श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे संत वचना प्रमाणे सिध्दबेटात जागतिक पर्यावरण दिना निमित्त येथील वैभव असलेल्या पुरातन संत लीलाभूमीत केळगाव ग्रामपंचायत, आळंदी नगरपरिषद, जनहित फाउंडेशन, चऱ्होली ग्रामपंचायत, आळंदी देवस्थान सह विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती, पदाधिकारी यांचे वतीने आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांचे हस्ते पुरातन अजानवृक्ष पुजा हरिनाम गजरात करण्यात आली. या उपक्रमात आळंदी जनहित फाउंडेशन सहयोगी संस्था यांचे माध्यमातून सिध्दबेटात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

श्रमदानातून वृक्षारोपण मोहिमेस जागतिक पर्यावरण दिनी पर्यावरणाचे संवर्धन,आणि माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत स्वच्छतेची शपथ, शिव वंदना घेत पर्यावरण दिन वृक्षारोपण करीत साजरा करण्यात आला.

या प्रसंगी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर , आळंदीजनहित फाउंडेशन अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर, सचिव रामदास दाभाडे, दत्तात्रय डफळ, केळगाव ग्रामपंचायत सरपंच गुंफाबाई ठाकर, उपसरपंच किरण मुंगसे, सुधीरभाऊ वहिले, बाळासाहेब वहिले, कैवल्य टोपे, नेचर फाउंडेशन अध्यक्ष भागवत काटकर, एल्गार सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब कवळासे नागरिक, स्वयंसेवक आदी उपस्थित होते.

आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी माझी वसुंधरा,स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत आळंदीत होत असलेल्या कार्याची माहिती देत. या कार्यात सेवाभावी संस्था सहभागी झाल्याने येथील विकास कामास तसेच हरित पट्टा अधिक गतीने हरित होऊन सिद्धबेट विकास निर्धारित वेळे पेक्षा लवकर विकसित होईल. पर्यावरण संवर्धनाचे उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले. माझी वसुंधरा अंतर्गत उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.

Advertisement

आळंदी जनहित फाउंडेशनसह आरंभ फाउंडेशन आणि विविध सेवाभावी संस्था यांचे माध्यमातून सिध्दबेटात पंचवटी उद्यान सह सुमारे एक हजारावर वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी सहकार्य केलेल्या सर्व श्रमिक संस्था, व्यक्ती यांचे कार्याचे कौतुक करीत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी, अधिकारी यांचा सन्मानपत्र, उपरणे, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या मध्ये जागतिक पर्यावरण दिन २०२५ निमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच पर्यावरण क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्याचा सामाजिक सन्मान या हेतूने ‘वृक्ष मित्र सन्मानपत्र’ देऊन पर्यावरण दिनी वृक्ष मित्र सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यात श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी उपव्यवस्थापक तुकाराम माने, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधवराव खांडेकर, केळगाव ग्रामपंचायत सरपंच गुंफाबाई ठाकर, उपसरपंच सुधीरभाऊ वहिले, माजी उपसरपंच किरणशेठ मुंगसे, चऱ्होली खुर्द ग्रामपंचायत प्रतिनिधी रोहित थोरवे, नेचर फाउंडेशन अध्यक्ष भागवत काटकर, जेष्ठ नागरिक वृक्ष मित्र दिनकर तांबे, एल्गार सेना अध्यक्ष बाळासाहेब कवळासे, डी. वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज दिलीप घुले, शरदचंद्र पवार महाविद्यालय कांबळे सर , पसायदान गुरुकुल योगेश वाघ गुरुजी, आळंदी महिला बचत गट महासंघ अध्यक्षा सुवर्णा काळे, राम जाधव यांना वृक्ष मित्र सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

आळंदी नगर परिषदेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन स्वच्छ सर्वेक्षण, माजी वसुंधरा ६ .० अंतर्गत पर्यावरण दिनी सिद्धबेट मध्ये आळंदी नगरपरिषद महिला बचत गट, हॅपीनॉल फाउंडेशन, पत्रकार बांधव यांच्या वतीने १०१ देशी रोपांचे वृक्षारोपण करून वसुंधरेची हरित शपथ घेऊन स्वच्छता अभियान राबवित जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी नागरिक सेवाभावी संस्था सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांचेसह उपस्थितांचे हस्ते वृक्षारोपण आणि सन्मानपत्र वाटप करण्यात आले. सर्वांनी फक्त एक दिवस पर्यावरण दिन साजरा न करता रोजच पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. राज्य शासन सिद्धबेटचा विकास करीत आहे. त्यांचे समवेत काम करून या भागातील पुरातन वैभव अजानवृक्ष संवर्धन, स्वच्छता व सुशोभीकरण हे सेवाभावी सेवा कार्य आपण करत आहोत. सिद्धबेटाचे अध्यात्मिक महत्व असतानाच इथे येणारे वारकरी संप्रदायातील अभ्यासासाठी येणारे विद्यार्थी आणि भाविक यांना सुंदर नैसर्गिक वातावरण निर्माण करून देण्यासाठी देशी झाडांची ओळख वाढवण्यासाठी अध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्ट्या महत्वपूर्ण असलेली पंचवाटीका उभी करण्यात आली आहे. शासनावर अवलंबून न राहता आपल्या पुढील पिढीसाठी प्रत्येकाने झाडे लावणे ,नदी स्वच्छता आणि प्लास्टिक कचरा वेगळा करून देणे ही आपली जबाबदारी मानून प्रत्येकाने सेवा कार्यात सहकार्य केले पाहिजे असे आवाहन यावेळी करण्यात आले. संयोजन अर्जुन मेदनकर, राजेंद्र घुंडरे, दत्तात्रय डफळ, रोहिदास कदम यांनी केले. कैवल्य टोपे यांनी सामूहिक शिववंदना घेत पर्यावरण दिनाचे कार्यक्रमाची सांगता केली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page