चऱ्होली खुर्द मध्ये पाईपचे कंपनी गोडाऊनला आग ; वित्तहानी ; सुदैवाने जीवित्हानी टळली
आळंदी (प्रतिनिधी ) :
आळंदी येथील आळंदी वडगाव रस्त्यावरील साई गार्डन मंगल कार्यालयाच्या दक्षिणेला असलेल्या पाईपच्या कंपनीत साहित्यास शॉक सर्किट मुळे लागलेल्या आहेत प्रचंड नुकसान झाले या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात वित्त आणि होऊन कंपनीचे प्रचंड नुकसान झाले. बुधवारी दुपारी साडेतीनशे सुमारास लागलेली आग सुमारे अडीच तासांच्या परिश्रमपूर्वक प्रयत्नानंतर विजविण्यात अग्निशामन दलाच्या जवानांना यश आले यासाठी पिंपरी चिंचवड महानगर परिषद अग्निशमन विभाग पीएमआरडीए अग्निशमन विभाग यांच्या जवानांनी अथक परिश्रम घेऊन सुमारे अडीच तासाच्या कालावधीत आग आटोक्यात आणली यावेळी परिसरात धुराचे लोट पसरले होते. या घटनेत जीवित हानी झाली नाही. मात्र पाईप चे कंपनीचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती पोलिस प्रशासनास मिळताच पोलिस आणि परिसरातील नागरिक, ग्रामस्थ यांनी मदतीस धाव घेतले. दुपारी साडे तीनचे सुमारास मोठी आग लागली. ही आग लागल्याचे समजताच अग्निशमन विभागास कळविण्यात आले. या वेळी पिंपरी चिंचवड अग्निशमन विभाग, पीएमआरडी विभाग चाकण नगरपरिषद अग्निशमन विभागाचे जवान, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन सुमारे साडे पाच चे सुमारास आग आटोक्यात आणली. आळंदी नगरपरिषद अग्निशमन विभागास माहिती मिळताच त्यांनी इतर अग्निशमन विभागास्तात कळवून मदत उपलब्ध करून दिली. आळंदी नगरपरिषद अग्निशमन विभागाची गाडी देखभाल दुरुस्तीस दिल्याचे समजते. यामुळे तत्काळ गाडी दुरुस्त होऊन कार्यरत ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली. गेल्या पंधरा दिवसां आळंदी परिसरात तीन आगीचे दुर्घटना घडल्या असल्याने उपाययोजना सक्षम आणि कार्यरत अद्यावत ठेवण्याची मागणी आळंदीतून जोर धरत आहे. पुढील तपास पोलिस प्रशासन करत आहे.






