नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे नवीन समर्थ विद्यालयात जागतिक चिमणी दिवस मोठ्याउत्साहात साजरा
तळेगाव दाभाडे :
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे नवीन समर्थ विद्यालयात आज गुरुवार दिनांक 20 मार्च 2025रोजी जागतिक चिमणी दिवस शाळेत अतिउत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पर्यावरण प्रेमी पर्यावरण पुरस्कार प्राप्त *श्री.संदीप पानसरेजी* तसेच पर्यावरण विषयी जनजागृती करणारे *श्री . विवेक भगतजी* तसेच शालेय समितीचे अध्यक्ष *श्री. सोनबा गोपाळे गुरुजी* व नवीन समर्थ विद्यालयाच्या व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या प्राचार्या *सौ.वासंती काळोखे* व पर्यवेक्षक *श्री. शरद जांभळे* हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. पर्यावरणाविषयी जनजागृती करणारे विवेक भगतजी यांनी माणूस हा बुद्धिमान प्राणी असून *”सर्विस टू मॅन सर्विस टू गॉड* ” च्या ऐवजी” *सर्विस टू इन्व्हरमेंट सर्व्हिस टू गॉड* ” या स्लोगनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच सहयोग फाउंडेशन मार्फत राबवल्या जाणाऱ्या *पक्षांसाठी खाऊगल्ली* या उपक्रमाची सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती दिली.पर्यावरण पुरस्कार प्राप्त श्री. संदीप पानसरे यांनी जर मुलांना पर्यावरण समजले तर भविष्यात त्यांना वृक्षांचे, पशुपक्ष्यांचे आपल्या जीवनातील स्थान उमजून त्यांच्या संरक्षण व संवर्धनाविषयीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. एकविरा शालेय समितीचे अध्यक्ष *श्री. सोनबा गोपाळे* यांनी मानव व पर्यावरणातील इतर गोष्टींची सांगड घालत असताना शहरीकरणामुळे चिमण्यांचे प्रमाण कमी होत आहे म्हणून वृक्ष, पशुपक्ष्यांचे संवर्धन करून त्यांच्या संरक्षणासाठी आपण प्रयत्नरत असलो पाहिजे. व आपल्या मनात पर्यावरणाविषयीची आस्था व आवड असली पाहिजे असा जीवनोपयोगी संदेश विद्यार्थ्यांना दिला. पर्यावरणाविषयीची आस्था असणाऱ्या आपल्या शाळेत ” *एक घास पक्ष्यांसाठी* “या उपक्रमाच्या अंतर्गत प्रत्येक मुलाने एक मूठभर धान्य जमा करावे,असे आव्हान करण्यात आले.उपासमारीमुळे त्यांना जीव गमवावा लागतो. या उपक्रमांतर्गत मुलांनी गहू, तांदूळ ,ज्वारी ,कडधान्य जमा करण्यात आले.त्या अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या घरून आणलेले धान्य जमा करून ते सहयोग फाउंडेशनच्या खाऊ गल्ली या उपक्रमासाठी सुपूर्द केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहासप्रेमी व पर्यावरणस्नेही **श्री. सुनील बोरुडे* * यांनी केले व आभार प्रदर्शन प्रशालेच्या प्राचार्या सौ. वासंती काळोखे यांनी केले तसेच सर्व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम उत्तमरीत्या संपन्न झाला.