देहू–देहूरोड भाजपाची संघटनात्मक ताकद वाढविण्याचा निर्धार; मासिक आढावा बैठक उत्साहात संपन्न
देहू :दि. 12 जून 2026 रोजी भारतीय जनता पार्टी श्रीक्षेत्र देहू–देहूरोड शहर मंडळाची मासिक आढावा बैठक विठ्ठलवाडी, देहुगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत संघटन विस्तार, आगामी उपक्रमांचे नियोजन आणि विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या प्रारंभी मावळ तालुक्याचे माजी उपसभापती मा. शांताराम बापू कदम यांची श्रीक्षेत्र देहू–देहूरोड शहर मंडळ प्रभारीपदी, जिल्हा सरचिटणीस मा. श्रीकृष्ण देशमुख यांची मावळ विधानसभा सहप्रभारीपदी तसेच सौ. बॉबीताई डीक्का यांची पुणे जिल्हा भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मा. गुलाब काका म्हाळसकर, रवींद्र आप्पा भेगडे, बाळासाहेब काळोखे, अशोक नाना साखोरे, गुरमीतसिंगजी रत्तू, तुकाराम नाना जाधव, उद्धवनाना शेलार, महावीरशेठ बरलोटा, प्रदीपकुमार बेंद्रे, अंजनी बत्तल, राहुलजी काकडे, राजेश शेलार यांच्यासह शहरातील ज्येष्ठ पदाधिकारी, आघाडी-मोर्चा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्ती, बूथस्तरीय संघटन मजबूत करणे, पक्षप्रवेश अभियानाचा आढावा, SIR मोहीम, BLO-2, बूथ अध्यक्ष व मन की बात प्रमुख यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या यशस्वी 12 वर्षपूर्तीनिमित्त विविध जनसंपर्क व सेवा उपक्रमांचे नियोजन करण्यात आले.
याशिवाय जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त वारकरी बांधवांचे स्वागत, नागरिकांसाठी ॲम्बुलन्स लोकार्पण, वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे आणि देहू–देहूरोड शहर भाजपा कार्यालय उद्घाटन सोहळ्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
“संघटन मजबूत, कार्यकर्ता सक्षम आणि सेवा हेच ध्येय” या भावनेतून आगामी काळातील सर्व उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
बैठकीचे सूत्रसंचालन नारायण तात्या पचपिंड यांनी केले. मंडल अध्यक्ष रघुवीर उद्धवराव शेलार यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.






