उद्योजक व्हायचे असेल तर नव उद्योजकांनी प्रशिक्षणाबरोबरच जिद्द आणि कठोर परिश्रम करावे तरच यश मिळते. ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर यांचे प्रतिपादन

SHARE NOW

वराळे:

Advertisement

मावळ तालुक्यातील वराळे येथे असणाऱ्या ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था(रुड सेट संस्था ) यांच्या वतीने आयोजित सीसीटीव्ही दुरुस्ती व देखभाल या १३ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी साप्ताहिक अंबरचे संपादक. ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर बोलत होते. यावेळी साखवळकर यांनी नव उद्योजकांना संबोधित केले. यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर नवउद्योजकांनी प्रशिक्षणाबरोबरच जिद्द आणि कठोर परिश्रम करावे तरच यश मिळते.रुड सेट संस्था ही शेतीपूरक तसेच बिगर शेती आधारित व्यवसायाचे प्रशिक्षण गेली सत्तावीस वर्ष देत असून महाराष्ट्राला उद्योजक पुरवण्याचे काम करत आहे. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे एखाद्या व्यवसायाचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असते असे सुरेश साखवळकर यांनी म्हटले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक राजकुमार बिरादार. तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल पवार. सचिव सोनबा गोपाळे (गुरुजी) ज्येष्ठ पत्रकार बी एम भसे. सुनील वाळुंज हे व्यासपीठावर उपस्थित होते. नवउद्योजक घडवण्यासाठी आमची संस्था अतिशय दक्षपणे काम करत असून नवउद्योजकांना उभे करण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ तसेच आवश्यक असलेले प्रोजेक्ट रिपोर्ट. मार्केटिंग याबाबतचे विनामूल्य मार्गदर्शन करत असते असे संचालक राजकुमार बिरादार यांनी यावेळी सांगितले. पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल पवार. सचिव सोनबा गोपाळे( गुरुजी) यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करून त्यांच्या नव्या उद्योगाला शुभेच्छा दिल्या. या प्रशिक्षणासाठी पुणे जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून ३५ विद्यार्थी उपस्थित असून संस्थेतर्फे त्यांना मोफत शिक्षण. राहण्याची व्यवस्था. व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी पत्रकार राजेंद्र जगताप. मनोहर दाभाडे. श्रीकांत चिपे. रजनी पानकर. शैलजा फुलकर. ज्येष्ठ पत्रकार धांडे सर. गणेश भेगडे हे मान्यवर देखील या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. संस्थेच्या योगिता गरुड. रवी घोजगे. बाळू अवघडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश निळकंठ यांनी केले. प्रास्ताविक प्रशिक्षक संदीप पाटील यांनी केले तर आभार रवी घोजगे यांनी मानले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page