रोटरी तळेगाव एमआयडीसीच्या अध्यक्षपदी प्रवीण भोसले तर सचिव पदी संदीप मगर यांची निवड .
तळेगाव दाभाडे :
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचा पदग्रहण सोहळा उत्साहात झाला. प्रवीण भोसले यांनी मावळते अध्यक्ष मिलिंद शेलार यांच्याकडून अध्यक्षपदाची, तर संदीप मगर यांनी मावळते सेक्रेटरी राजेंद्र पंडित यांच्याकडून सेक्रेटरी पदाची सूत्रे स्वीकारली.
या सोहळ्यास *रोटरी ३१३१ सन २०२७ – २८*
चे प्रांतपाल चारुचंद्र *श्रोत्री* उपप्रांतपाल विल्सेंट सालेर, क्लबचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, मिलिंद शेलार, प्रकल्प प्रमुख बाळासाहेब शिंदे,सहप्रकल्प प्रमुख सचिन कोळवणकर यांच्यासह रोटरी सदस्य उपस्थित होते.
रोटरी एमआयडीसी क्लबने दर्जेदार आणि विधायक उपक्रम
राबवून आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. यापुढेही असेच समाजोपयोगी उपक्रम राबविले जावेत, असे प्रतिपादन चारुचंद्र *श्रोत्री* यांनी केले.
*महाजन यांना रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड*
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने प्रसिद्ध सतार वादक विदुर महाजन यांना रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड
हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन महाजन यांना सन्मानित करण्यात आले. माही फाउंडेशन कडधे येथील अनाथाश्रमाच्या प्रमुख विद्या बेनगूडे यांनी रोटरी क्लबने दिलेला वाटर फिल्टर स्वीकारला.
चारुचंद्र *श्रोत्री*आणि संतोष खांडगे यांच्या हस्ते महाजन यांना सन्मानित करण्यात आले.
स्वागत पर मनोगत संतोष खांडगे यांनी केले. मनोगतात त्यांनी क्लब राबवीत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. रजनीगंधा खांडगे यांनी मानपत्राचे वाचन केले.
क्लबच्या वतीने इंटरनॅशनल क्लबला ३ हजार पेक्षा अधिक
डॉलर देण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी जाहीर केले. मान्यवरांच्या हस्ते रोटरीच्या सर्व मेंबरचे पिनअप करण्यात आले. सूत्रसंचालन लक्ष्मण मखर व ज्योती नवघणे यांनी केले .आभार प्रदर्शन उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केले.






