‘स्कूल चले हम ‘म्हणत कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात

SHARE NOW

तळेगाव दाभाडे.

Advertisement

सोमवार दिनांक 15 जून 2026. तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज शैक्षणिक वर्ष 2026 27 यासाठी वाजलेली शाळेची पहिली घंटा ऐकून सर्वच विद्यार्थी व शिक्षकांच्या चेहऱ्यावरचा आनंद खुलून आला. संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. संदीपजी काकडे, संचालिका सौ. गौरी काकडे, मुख्याध्यापिका सौ. सीमा देशमुख, उपमुख्याध्यापिका सौ. ज्योती सावंत, तसेच बालवाडी विभागाच्या पर्यवेक्षिका सौ. अंजली कुलकर्णी, शिक्षकवृंद , विद्यार्थी व मागील शैक्षणिक वर्ष 2025- 26 या वर्षातील इयत्ता दहावीच्या वर्गात उत्तमोत्तम गुण मिळवणारे सर्व विद्यार्थी, तसेचं मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पालक यांचे मोठ्या जल्लोषात ढोल- ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर शाळेच्या वतीने आज ‘फादर्स डे सेलिब्रेशन’ सुद्धा करण्यात आजच करण्यात आले. आलेल्या सर्व फादर्स पालकांचे संस्थेच्या वतीने भेटकार्ड व चॉकलेट देऊन त्यांना फादर्स डे च्या शुभेच्छा देण्यात आल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या गेट समोर औक्षण पुष्पवृष्टी व ढोल ताशांच्या गजरात त्यांचेही स्वागत मोठ्या उत्साहाने करण्यात आले. यानंतर इ. दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आतापर्यंतच्या शैक्षणिक जीवनातील विविध अनुभवांचे मनोगत आपल्या शब्दात व्यक्त करून उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी खेळ, अभ्यास व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन आपला सर्वांगीण विकास करावा असे सांगितले, तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता कायम सातत्य व चिकाटीच्या जोरावर आपण यश संपादन करावे असे सांगितले. यानंतर इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी आज उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी एक नृत्य व एक नाटिका सादर केली व त्यातून हाच संदेश दिला की खेळ, स्पर्धा, इतर सांस्कृतिक कार्यक्रम व अभ्यास यांची सांगड घालून आपण आपली स्वप्नं पूर्ण करू शकतो . यानंतर शाळेच्या शिक्षिका सौ. किरण पाटील यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ. ज्योती सावंत यांनीही आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करून भविष्यकाळात आपण आपल्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी सतत आपले पालक, गुरुजन व इतर मोठ्या माणसांचा आदर राखावा व त्यांनी सांगितलेल्या वाटेवर चालावे म्हणजे यश आपलेच असते असे त्या म्हणाल्या. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा देशमुख यांनीही सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे स्वागत करून पुढील शैक्षणिक वर्षासाठी आपण कसोशीने प्रयत्न करून आपली स्वप्ने पूर्ण करावीत असे सांगितले. तर संचालिका सौ. गौरी काकडे यांनी आज उपस्थित असलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे अनुकरण करून त्यांच्याप्रमाणेच आपणही आपले आपल्या पालकांचे व शाळेचे नाव उज्वल करावे असे सांगितले. यानंतर संस्थेचे अध्यक्ष मा. संदीपजी काकडे यांनीही पुढील शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासच नाही तर शाळेमध्ये होणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेऊन आपापली कौशल्य पणास लावून आपल्या सर्वांगीण विकासावर भर द्यावा व त्यासाठी सर्व शिक्षकांनीही तयारीत असावे असे सांगितले. यानंतर सर्व विद्यार्थी आनंदी वातावरणात आपापल्या वर्गात दाखल झाले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका सौ. धनश्री महाजन व सौ. जयश्री जगताप यांनी केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page