पिंपरी-चिंचवडमध्ये सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण व जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडे तक्रार

SHARE NOW

| प्रतिनिधी  : पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पथविक्रेता समिती सदस्य पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पत्रकारिता करीत असलेले माऊली उर्फ किसन रामा भोसले यांना स्वयंघोषित कामगार नेते काशिनाथ नखाते व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवागळ करून मारहाण केल्याची घटना दिनांक १२ जून रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी घडली. त्यामुळे नखाते व त्यांचे सहकारी यांच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तसेच मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून लोकांची गर्दी जमवून दंगा केल्याबद्दल वाकड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असल्याचे श्री किसन उर्फ माऊलीभोसले यांनी संबंधित पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीमध्ये दिले म्हणून सांगितले.

Advertisement

 

तक्रारीनुसार, माऊली उर्फ किसन भोसले हे गेल्या अनेक वर्षांपासून शहरात  सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवत आहेत. सदर तक्रारीत भोसले यांनी म्हटले की, काही दिवसा पूर्वी आमदार महेश दादा लांडगे आणि माजी महापौर यांच्यातील शाब्दिक चकमक घडल्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केली व तो व्हिडिओ प्रसारित केल्याचा राग मनात धरून काशिनाथ नखाते व त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिनांक १२ जून २०२६  रोजी १.१५ वाजण्याच्या सुमारास जमावबंदी आदेश लागू असताना चाळीस ते पन्नास व्यक्ती एकत्र येत ड क्षेत्रीय कार्यालय येथे क्षेत्रीय अधिकारी यांना पत्र  देण्याचा बनाव करून,मी सदर ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती रेकी करून माहिती प्राप्त केली. त्यानुसार पूर्व नियोजित कट करून हा जमाव तेथे आला.मी अगोदरच ड क्षेत्रीय कार्यालय येथे माझ्या व्यक्तिगत कामानिमित्ताने गेलो होतो. अचानक माझ्या मागावर येऊन तेथे काशिनाथ नखाते व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ करायला सुरुवात केली.पारधी समाजाची लोक गद्दार, तुम्ही चोऱ्या करून पोट भरणारी जात तुमची, तुम्हाला चिखलातून वर घेतला तर माजला का,आमच्या कार्यक्रमात येऊन आमच्या बातम्या करतो का.धरा त्याला आज जिवंत नका सोडू असे म्हणत नखाते व त्यांचे सहकारी यांनी मला मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केली. मी माझा जीव वाचवण्यासाठी नखाते यांना धक्का दिला,व माझी सुटका करून घेण्याचा पर्यंत करीत मी पोलिस ठाण्यात जाऊन तुमच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले.तेव्हा मला मारहाण करणारे नखाते व संपूर्ण जमाव बाजूला गेला.

 

या प्रकरणी संबंधित व्यक्तींविरोधात अनुसूचित जाती-जमाती(अत्याचार प्रतिबंधक)अधिनियम १९८९ तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी,अशी मागणी स्वतःलेखी तक्रारी देऊन किसन भोसले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक,वाकड पोलीस ठाणे यांच्याकडे केली आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page