भोर तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

SHARE NOW

भोर प्रतिनिधी –

 

रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी नांदगाव (ता. भोर, जि. पुणे) येथील विहारामध्ये भोर तालुका बौद्धजन संघ, पुणे आणि भारतीय बौद्धजन विकास समिती, पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

 

या कार्यक्रमात भोर तालुक्यातील दुर्गम, डोंगरी भागातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना वही, पेन आणि दप्तरांचे वितरण करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

Advertisement

 

कार्यक्रमास भोर तालुका बौद्धजन संघ, पुणे तसेच भारतीय बौद्धजन विकास समिती, पिंपरी-चिंचवडचे पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय नांदगाव, आपटी, निगुडघर, म्हसर आणि परिसरातील विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 

शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page