सौ लताताई महिला विकास फाउंडेशन तर्फे नथ व ग्रेव्ही मेकिंग क्लासचे यशस्वी आयोजन; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
देहू
सौ. शिल्पा योगेश परंडवाल (अध्यक्षा, सौ लताताई महिला विकास फाउंडेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली नथ मेकिंग क्लास व ग्रेव्ही मेकिंग क्लासचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या उपक्रमामध्ये महिलांना महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या पारंपरिक ‘नथ’ बनवण्याचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. नथीसाठी मणी गुंफणे, तारांचा वापर करून आकर्षक आकार देणे, त्यावर नक्षीकाम करणे यांसह सूर्य नथ, प्रेस नथ, मंगळसूत्राची वाटी, अंगठी यांचे बारकावे तज्ज्ञांकडून शिकवण्यात आले.
तसेच स्वयंपाकातील कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी विविध प्रकारच्या ग्रेव्ही तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यामध्ये व्हाईट ग्रेव्ही, रेड ग्रेव्ही आणि ब्राऊन ग्रेव्ही घरच्या घरी कशा तयार कराव्यात याचे मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणानंतर सहभागी महिलांनी आनंद व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले. “आम्हाला नवीन कौशल्य शिकायला मिळाले आणि आत्मविश्वास वाढला,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
आयोजकांनी सांगितले की, महिलांना केवळ प्रशिक्षण देणे हा उद्देश नसून त्यांना स्वावलंबी बनवून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे.
यावेळी सौ. शारदा परंडवाल, सौ. शिवानी परंडवाल, सौ. राजश्री परंडवाल, सौ. काळोखे तसेच अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.






