कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘करियर गायडन्स’ चर्चासत्राचे आयोजन!
तळेगाव दाभाडे :
दिनांक 3 जानेवारी 2025. रोजी कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थ्यांसाठी करियर निवड आणि ताण व्यवस्थापन यावर एक ज्ञानवर्धक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक मा.श्री चंद्रकांत काकडे,संस्थेचे अध्यक्ष श्री.संदीप काकडे,खजिनदार सौ. गौरी काकडे, संचालिका सौ. सोनल काकडे, संचालिका सौ.सुप्रिया काकडे,मुख्याध्यापिका सौ. ज्योती सावंत,पर्यवेक्षिका सौ. कीर्ती कुलकर्णी तसेच एम.आय.टी कॉलेजचे प्रोफेसर आरिफ इनामदार व प्रोफेसर प्रियदर्शनी हेंद्रे उपस्थित होत्या.प्रोफेसर आरिफ इनामदार व प्रोफेसर प्रियदर्शनी हेंद्रे यांनी या चर्चासत्राचे आयोजन केले. प्रोफेसर आरिफ इनामदार सरांनी ताण व्यवस्थापन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परीक्षेचे नियोजन अभ्यास कसा करावा तसेच वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. प्रोफेसर सौ. प्रियदर्शनी हेंद्रे यांनी विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन याविषयी माहिती दिली विद्यार्थ्यांनी दहावी नंतर कोणते क्षेत्र निवडावे, याबाबत मौल्यवान मार्गदर्शन केले. कला, वाणिज्य व विज्ञान क्षेत्राबाबत विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या शंकाचे निरसन करण्यात आले. तसेच या क्षेत्रातील विविध , करिअर प्रवाहांबद्दल मौल्यवान माहिती दिली. हा सर्वांगीण दृष्टिकोन विद्यार्थ्यांना केवळ माहितीपूर्ण करिअर निर्णय घेण्यास सक्षम बनवणार नाही तर त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढ देखील करेल. दहावीनंतर स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना उत्तम संधी मिळण्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्यात, कोणते क्षेत्र निवडावे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळण्यासाठी कोणते कॉलेज निवडावेत यावर मार्गदर्शन केले. शालेय मुख्याध्यापिका सौ. ज्योती सावंत यांनी तणाव व्यवस्थापन ही विद्यार्थी व पालकांच्या दृष्टीने काळाची गरज असल्याने व विद्यार्थ्यांना विविध परीक्षेला सामोरे जाताना येणाऱ्या अडचणींचे निरसन होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असे सांगितले.यावेळी विद्यार्थ्यांचे पालकही बहुसंख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांची बौद्धिक चाचणी घेण्यात आली.विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही मार्गदर्शन करण्यात आले. पालक व शिक्षक यांनी मिळून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा करावा याविषयीचे मार्गदर्शन या कार्यक्रमात करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शालेय सहशिक्षिका सौ.विद्या देशमुख यांनी केले.