तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्रं ४ मध्ये शुक्रवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्रं ४ मध्ये शुक्रवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी माननीय शिल्पाताई रोडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भूमिका अभिनय स्पर्धा , हस्ताक्षर स्पर्धा, पाढे पाठांतर स्पर्धा, आदर्श विद्यार्थिनी, शंभर टक्के उपस्थिती, रांगोळी स्पर्धा तसेच लोकनृत्य स्पर्धा याचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठानचे माननीय श्री.रवींद्र दाभाडे तसेच शारदीय नवरात्र उत्सव समिती अध्यक्ष मा.सौ.अश्विनीताई दाभाडे आणि माजी नगरसेविका सौ.नीलिमाताई दाभाडे यांच्यातर्फे सन्मान चिन्ह देण्यात आले .परीक्षक म्हणून श्रीमती सुरेखा जाधव, सौ.शामल खानेकर यांनी काम पाहिले. शिक्षण मंडळाचे सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक श्री.सोपान आल्हाट सर व शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ.जयश्री पावसे मॅडम यांनी 170 विद्यार्थिनींना खाऊचे वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. निकिता शितोळे यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता तिकोने मॅडम तसेच सौ.बेबी जाधव, सौ वैशाली साबळे, सौ.आशा गायकवाड व सौ.प्राची लोमटे मॅडम यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात पार पडला