बी.फार्मसी विद्यार्थ्यांची संतुलन फार्मास्युटिकल्सला शैक्षणिक भेट; उद्योग क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव
तळेगाव दाभाडे :

इंद्रायणी विद्या मंदिर शिक्षण संस्थेच्या कृष्णराव भेगडे इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च महाविद्यालयातील बी.फार्मसी तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी संतुलन फार्मास्युटिकल्स व आत्मसंतुलन क्लिनिक येथे शैक्षणिक भेट देत औद्योगिक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
या इंडस्ट्रियल व्हिजिटचे आयोजन प्रा. मुग्धा जोशी यांनी केले होते. यावेळी प्रा. विक्रांती कोळी, प्रा. पूजा सावंत व प्रा. रेश्मा धकाते उपस्थित होत्या.

भेटीचा शुभारंभ डॉ. संजय आरोटे, डॉ. संभाजी मालघे, डॉ. जी. एस. शिंदे व डॉ. भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. संतुलन फार्मास्युटिकल्सचे डॉ. गुरु प्रसाद कुलकर्णी व श्री. विजयेश कट्टकल्लम यांनी विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक औषधांच्या निर्मिती प्रक्रिया, उत्पादन पद्धती व गुणवत्ता नियंत्रण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी औषधनिर्मितीतील विविध टप्पे प्रत्यक्ष पाहून ज्ञानात भर घातली.
या शैक्षणिक उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास काकडे, कार्यवाहक श्री. चंद्रकांत शेटे, खजिनदार सौ. निरुपा कानिटकर, उपाध्यक्ष श्री. संजय साने व श्री. शैलेश शाह यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.






