*सरस्वती विद्या मंदिर तळेगाव दाभाडे मध्ये दिंडी सोहळा उत्साहात साजरा*
तळेगाव दाभाडे :
सरस्वती शिक्षण संस्थेचे सरस्वती विद्या मंदिर तळेगाव दाभाडे येथे बुधवार दिनांक १७/०७/२०२४रोजी दिंडी सोहळा उत्साहात साजरा झाला.
ज्ञानोबा माऊलींचा जयघोष आणि टाळ मृदुंगाचे निनाद करत सरस्वती विद्या मंदिरने दिंडी सोहळाचे आयोजन केले होते विठ्ठलाच्या भक्तीने आणि आषाढातील पावसांच्या सरींनी विद्यालयाचा संपूर्ण परिसर न्हाऊन निघाला याप्रसंगी सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.सुरेश झेंड व सौ.श्रध्दा झेंड ,खजिनदार सौ.सुचित्रा चौधरी व श्री शेखर चौधरी मा.सौ. शुभांगी देशपांडे , माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.रेखा परदेशी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री नवनाथ गाढवे सर आणि बालवाडी विभाग प्रमुख सौ. सोनाली काशीद बाई ,सर्व सहशिक्षक यांच्या हस्ते पालखी पूजन करून विठ्ठलाची आरती झाली.
तसेच या कार्यक्रमासाठी सरस्वती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.दिलीप कुलकर्णी , कार्यवाह श्री.प्रमोद देशक ,संस्थेच्या शिक्षण समिती सदस्या डॉ.सौ.ज्योतीताई चोळकर,सदस्य श्री.विश्वास देशपांडे ,सदस्य मा.श्री.सुनिल आगळे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या दिंडी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनाचे उत्तम सहकार्य लाभले.
या सोहळ्यात विद्यार्थी विठ्ठल रखुमाई , राधाकृष्ण तसेच वेगवेगळ्या संतांच्या वेशभूषेत उपस्थित होते .या सोहळ्यात पर्यावरणाचे संदेश देणारी बॅनर घेऊन विद्यार्थी सहभागी झाले यामध्ये स्वच्छतेचे महत्त्व सांगणाऱ्या ,पर्यावरणाच्या संरक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा विद्यार्थी देत होते तसेच डोक्यावर तुळस, कळशी घेऊन विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते. तसेच प्राथमिक व माध्यमिक च्या विद्यार्थ्यांनी लेझीम,नृत्य, रिंगण, झांज यांचे सादरीकरण केले.
या सोहळ्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
यानंतर पसायदानाने दिंडीची सांगता झाली व नंतर विद्यार्थ्यांना राजगिऱ्याची वडी खाऊ स्वरूपात वाटण्यात आले.