इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कांतिलाल शाह विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात मोठ्या उत्साहात साजरा.
तळेगाव दाभाडे :
संपूर्ण देशभरात देशभक्तीची भावना उचंबळून येत असताना इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कांतिलाल शाह विद्यालयात 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने व देशभक्तीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध उद्योजक,मा. प्रशांत बोरा या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मा. प्रशांत बोरा यांच्या हस्ते ध्वजवंदन करून करण्यात आली, या वेळी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे खजिनदार मा.शैलेश शहा , रॉ.मा.दीपक शहा , इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे सद्स्य मा. विलास काळोखे,ला. सुनील जैन व तसेच शाळेच्या मुख्याध्यापक अनन्या कुलकर्णी , उपमुख्याध्यापिका वैशाली शिंदे , अर्चना चव्हाण हे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांमधून, भाषणांमधून, व नाट्य सादरीकरणांमधून महान नेत्यांच्या बलिदानाला वंदन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग आणि त्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला.
संपूर्ण कार्यक्रम माननीय मुख्याध्यापक अनन्या कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वीरीत्या पार पडला. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच कार्यक्रमाला एक वेगळा उठाव आला आणि शाळेने संविधानाच्या मुल्यांना अधोरेखित करत एकतेचा संदेश दिला.
या कार्यक्रमासाठी कांतीलाल शाह विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.