*कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च महाविद्यालया मार्फत नवलाख उंब्रे विद्यालयात आरोग्य तपासणी व जनजागृती शिबीर आयोजन*
मावळ पुणे :
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च महाविद्यालयातर्फे आज दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी श्रीराम विदयालय नवलाख उंब्रे येथील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना दिवस आणि जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्त साधून आरोग्य शिबिर व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात हिमोग्लोबिन तपासणी, रक्तगट तपासणी आणि बीएमआय आदी तपासणी त्यासोबतच निरोगी आरोग्यासाठी विद्यार्थ्यांना एन्टीबाओटीक औषधांचा योग्य वापर, औषधांचा दुरुपयोग, वैयक्तिक स्वच्छता यासंबधंतीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले.
या आरोग्य शिबीर कामी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे सदस्य मा. श्री. युवराज काकडे, श्रीराम विद्यालयाचे मुख्यध्यापक मा. श्री.गणपत कायगुडे, बी. फार्मसी प्राचार्य डॉ. श्री. संजय आरोटे, डी. फार्मसी विभाग प्रमुख प्रा. श्री. गुलाब शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयीन कार्यक्रम अधिकारी डॉ. योगेश झांबरे, प्रा. निलेश सोनवणे तसेच इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. श्री. अरुण शेटे,शालेय विकास समितीचे अध्यक्ष मा.श्री. सुरेश शेटे आदींनी या शिबीर साठी अनमोल मार्गदर्शन केले. महाविद्यालयाकडून राष्ट्रीय सेवा योजनेच्या औचित्याने सामाजिक कार्यासोबतच निरोगी आरोग्यासाठी जनजागृती होण्यास वाव मिळेल,अशी आशा यावेळी मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली.
या आरोग्य आणि जनजागृती शिबीरासाठी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रामदासजी काकडे, कार्यवाह मा. श्री. चंद्रकांत शेटे, सदस्या व मार्गदर्शिका सौ. निरुपा कानिटकर, तसेच इतर विश्वस्त मंडळ आदींनी मार्गदर्शन केले.