*काळोखे पतसंस्थेच्या वतीने मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया व चष्मे वाटप शिबीर!*
*तळेगाव दाभाडे:
तळेगाव दाभाडे येथील नारायणराव काळोखे नागरी सहकारी पतसंस्था यांचे वतीने व मायमार मेडिकल कॉलेज व जनरल हॉस्पिटल यांचे माध्यमातून तळेगाव स्टेशन येथील आई तुळजा भवानी मंदिर, टेल्को कॉलनी येथे शनिवार दिनांक २६/४/२०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत तळेगाव मायमर मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी व वडगाव मावळचे सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांचे प्रमुख उपस्थितीत मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप शिबिराचे भव्य स्वरूपात आयोजन केले आहे.या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची नेत्र तपासणी करून आवश्यक त्या शस्त्रक्रिया व लागणारी संपूर्ण ट्रीटमेंट मोफत केली जाणार आहे तरी तळेगाव शहरातील व पंचक्रोशीतील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन काळोखे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे, उपाध्यक्ष सुर्यकांत काळोखे,सचिव विश्वनाथ काळोखे यांनी केले आहे.*