स्व. मोहम्मद रफी यांच्या जयंती निमित्त स्व. मोहम्मद रफी फॅन क्लब तळेगाव दाभाडे यांच्या वतीने सदाबहार गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन.

SHARE NOW

गेली सतरा वर्षांपासून दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील दि.24/12/2023 रोजी *स्व मोहम्मद रफी* यांची जयंती निमित्ताने *स्व मोहम्मद रफि फॅन क्लब तळेगाव दाभाडे* यांचे वतीने सदाबहार गाण्याचा कार्यक्रम , लायन्स क्लब तळेगाव दाभाडे येथे आयोजित करण्यात आला होता, या वेळी , कार्यक्रमाचे *दीपप्रज्वलन व पुष्पहार पंडित किरण परळीकर , माजी नगरसेविका कल्पनाताई भोपळे, मोहम्मद रफी फॅन क्लब चे संस्थापक व माजी नगरसेवक सूर्यकांत काळोखे मा. सभापती ब्रिजेंद्र किल्लावाला, माजी नगरसेवक संतोष हरिभाऊ दाभाडे, उद्योजक बाबा चौरे, मोहम्मद रफी फॅन क्लबचे अध्यक्ष नितीन खळदे बाळकृष्ण लोणकर* आदि मान्यवरांचे हस्ते करण्यात आले,

Advertisement

 

या कार्यक्रमामध्ये अनेक गायकांनी भाग घेतला त्यामध्ये संस्थापक सदस्य *सतिश देशपांडे ,माजी नगरसेवक संतोष हरिभाऊ दाभाडे, चीफ इंजिनिअर (त दा न प ) मल्लिकार्जुन बनसोडे, सुभाष वाळुंज ,अमोल बर्वे, नागराज मुंडरर्गी, सुरेश काळे,वरदा मातापूरकर, आयशा सय्यद, विजय चौधरी, प्रकाश हेरेकर सोनाली यादव, आरिफ सय्यद* आदी 25 गायकांनी भाग घेतला,

साउंड सिस्टमची जबाबदारी *विजय चौधरी* यांनी उत्तमप्रकारे पारपाडली.

मोहम्मद रफी फॅन क्लबचे सभासद *बाळकृष्ण लोणकर, बशीर पठाण अमित कुलकर्णी,तुषार खेर्डे,,यश हंबीर, पराग गायकवाड रवींद्र वैद्य* आदी सभासदांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन जेस्ट सभासद *अनिल धर्माधिकारी* यांनी केले .

यावेळी तळेगाव दाभाडे शहरातील *जेष्ठ पत्रकार पंडित सुरेश साखळकर साहेब , विलास भेगडे, अमीन खान, महेश भागीवंत, रेखा भेगडे ,जमीर नालबंद* सह महान गायक मोहम्मद रफी यांचे चाहते, रसिकवर्ग ,मोठ्याप्रमाणात नागरिक उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page