तळेगाव रोटरी चॅलेंजर्सचा दिमाखदार प्रथम पदग्रहण सोहळा!* रोटरी सिटीचा जागतिक विक्रम–रो.मंजू फडके

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

रविवार दिनांक 9 जून रोजी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी पुरस्कृत रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स या नूतन क्लबचा प्रथम पदग्रहण सोहळा व सनद प्रदान समारंभ नुकताच तळेगाव दाभाडे येथील वैशाली मंगल कार्यालयात थाटामाटात संपन्न झाला सदर प्रसंगी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या गव्हर्नर रो मंजू फडके यांनी रोटरी सिटीच्या उपक्रमांचे कौतुक करताना पंचक्रोशीतील दिव्यांग बांधवांसाठी सुरू केलेला हा जगातील पहिला क्लब असून रोटरी सिटीने हा जागतिक विक्रम केला आहे असे प्रतिपादन रो.मंजू फडके यांनी करताना रोटरी चॅलेंजर्सला पुढील २ वर्षे आपण सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे मंजू फडके यांनी सांगितले.२०२५-२५चे गव्हर्नर शितल शहा यांनी रोटरी चॅलेंजर्स हा जगातील एक आगळावेगळा व अव्हानात्मक क्लब असून या क्लबला पहिल्या वर्षी 50% फी सवलत देणार असल्याचे प्रतिपादन केले.२०२५-२६चे गव्हर्नर रो संतोष मराठे यांनी या क्लबच्या सर्वतोपरी पाठीशी राहू अशी ग्वाही दिली.२६-२७चे गव्हर्नर नितीन ढमाले यांनी विविधांगी उपक्रमांविषयी माहिती देताना क्लबला शुभेच्छा दिल्या. सनद प्रदान व पदग्रहण सोहळ्यासाठी डिस्ट्रिक्ट मेंबरशिप डायरेक्टर रो.प्रसाद गणपुले, पीडीजी रो. प्रमोद जेजुरीकर, रो.दिलीप देशपांडे, रो.तावडे व पदाधिकारी तसेच सी.आर.पी.एफ.चे डेप्युटी कमांडर राजेंद्र प्रसाद,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबनराव भोंगाडे,रो. सुनील पवार इनरव्हिल अध्यक्षा संध्या थोरात अर्चनाताई म्हाळसकर,रो. विल्सन सालेर,मनोज ढोरे व विविध क्षेत्रातील पदाधिकारी, रोटरी मेंबर,पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

या दिमागदार सोहळ्याची सुरुवात चॅलेंजर्स ग्रुपच्या विद्यार्थ्यांच्या गणेश वंदनाने झाली . रोटरी सिटीचे अध्यक्ष रो.सुरेश शेंडे यांनी मनोगताद्वारे रोटरी सिटीच्या विविधांगी उपक्रमांची माहिती सांगताना चॅलेंजर्स क्लबला सर्व प्रकारे मदत करण्याची ग्वाही दिली व नूतन क्लबच्या भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या तर न्यू क्लब ॲडव्हायझर रो.नितीन शहा यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाद्वारे रोटरी चॅलेंजर्स हा आगळावेगळा क्लब सुरू करण्याचे उद्देश विशद केला व रोटरी सिटीच्या माध्यमातून नवीन उपक्रम घेण्याचा मानस व्यक्त करताना चॅलेंजर्स क्लब ची पुढील वाटचाल कशी असेल हे नितीन शहा यांनी विशद केले. न्यू क्लब ॲडव्हायझर रो संजय मेहता यांनी संस्थापक अध्यक्षा रो. ज्योती राजिवडे यांचा परिचय करून दिला तर रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स हा समाजामधील दिव्यांग बांधवांसाठी उपयुक्त उपक्रम घेणार असून समाजपयुक्त उपक्रम या क्लबच्या माध्यमातून घेतले जातील, विशेषतः अंध बांधवांसाठी क्रिकेट स्पर्धा घेण्याचा मनोदय संस्थापक अध्यक्षा रो.ज्योती राजिवडे यांनी मनोगताद्वारे व्यक्त केला. व्यासपीठावरील मान्यवरांचे सत्कार अध्यक्ष रो. सुरेश शेंडे,संस्थापक अध्यक्ष रो.विलास काळोखे,उपाध्यक्ष रो.किरण ओसवाल,सेक्रेटरी रो.भगवान शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

*चॅलेंजर्स क्लब सुरू करताना न्यू क्लब ॲडव्हायझर रो.नितीन शहा, न्यू क्लब ॲडव्हायझर रो. संजय मेहता,रो.दिलीप पारेख,रो. तानाजी मराठे यांनी अथक परिश्रम व मेहनत घेतली तसेच संस्थापक अध्यक्ष रो.विलास काळोखे,रो.संग्राम जगताप,रो.स्वाती मुठे,उद्योजक भरत राजिवडे यांनी उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिपाली झवर यांनी केले तर आभार चॅलेंजर्स क्लबचे उपाध्यक्ष रो. संदीप भोसलकर यांनी मानले अध्यक्ष म्हणून रो. ज्योती राजिवडे, उपाध्यक्ष रो. संदीप भोसलकर, सेक्रेटरी रो. वासुदेव लखिमले यांच्यासह बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांनी पदाची शपथ घेतली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी सिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य,तसेच रोटरी चॅलेंजर्स चे पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page