अॕड्.पु.वा.परांजपे विद्यामंदिराची दैदिप्यमान कामगिरी, गुणवत्ता संवर्धन अभियानात जिल्हा पातळी (ग्रामीण विभाग)द्वितीय क्रमांकाचे मानकरी*
तळेगाव दाभाडे :
पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने *शैक्षणिक वर्ष 2024- 25 मध्ये पुणे, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातील 1500 पेक्षा जास्त शाळांसाठी राबविण्यात आलेल्या गुणवत्ता संवर्धन अभियानात तालुक्यामध्ये विविध गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळांची* तीनशे गुणांची जिल्हास्तरीय सखोल पुनर्रतपासणी करण्यात आली होती . यामध्ये *प्रामुख्याने शाळेतील भौतिक सुविधा, प्रशासन विषयक बाबी, संपूर्णपणे सौर उर्जेवर चालणारी पर्यावरण पूरक शाळा, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून अध्ययन अध्यापन करणारी मावळ तालुक्यातील पहिली संपूर्ण डिजिटल शाळा,शाळेतील विविध विभाग तसेच गुणवत्ता संवर्धनासाठी शाळेने केलेले प्रयत्न इत्यादी निकषांमध्ये शाळेने बाजी मारली .पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर साहेब व पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर साहेब यांनी नुकताच जिल्हास्तरीय निकाल जाहीर केला आहे. यामध्ये नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे संचलित, अॕड्.पु.वा.परांजपे विद्यामंदिराने 500 ते 1000 विद्यार्थी संख्येच्या शाळांमध्ये जिल्हा पातळीवर द्वितीय क्रमांक पटकावून संस्थेच्या व शाळेच्या वैभवात भर टाकली आहे* खरोखरीच ही अतिशय अभिमानाची व कौतुकाची बाब आहे *विजेत्या शाळांचा गौरव समारंभ गणेश कला क्रीडा सभागृह पुणे येथे दिनांक 24 एप्रिल 2025* रोजी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे . *अॕड्.पु.वा. परांजपे विद्यामंदिर शाळेने गुणवत्ता संवर्धन अभियानात जिल्हास्तरावर मिळविलेल्या यशाबद्दल नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे संस्थेचे माजी अध्यक्ष ,मार्गदर्शक, मावळभूषण,शिक्षण महर्षी,माजी आमदार कृष्णरावजी भेगडे साहेब, अध्यक्ष,माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे साहेब ,उपाध्यक्ष गणेश खांडगे साहेब, संस्थेचे उपक्रमशील सचिव संतोष खांडगे साहेब,सहसचिव व शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार शेलार साहेब, खजिनदार राजेशजी म्हस्के साहेब व सर्व संचालक मंडळ,सर्व आजी-माजी विद्यार्थी, पालक यांच्यावतीने सर्व स्तरांतून शाळेचे कार्य कुशल, अष्टपैलू मुख्याध्यापक पांडुरंग पोटे सर,शिस्तप्रिय पर्यवेक्षिका रेखा भेगडे मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंदांचे विशेष कौतुक व अभिनंदनचा वर्षाव होत आहे*.