स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये कचरा व्यवस्थापनावरील उपयुक्त कार्यशाळा

SHARE NOW

तळेगाव दाभाडे:

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतर्फे स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत कचरा व्यवस्थापन विषयावर उपयुक्त व माहितीपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आधुनिक काळातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

या प्रसंगी नगरपरिषदेच्या वतीने अंकिता माने, श्रीकांत बलवंदे व अमृता जगदाळे हे मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना ओला–सुका कचरा व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण, Reduce–Reuse–Recycle यांचे महत्त्व तसेच घरगुती पातळीवरील शिस्तबद्ध कचरा हाताळणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. “स्वच्छतेतून आरोग्य आणि आरोग्यातून प्रगती” हा महत्त्वपूर्ण संदेशही यावेळी देण्यात आला.

विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत विचारलेल्या प्रश्नांना मार्गदर्शकांनी संयमाने उत्तरे दिली व प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी पडतील असे उपाय सुचवले. काही विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक सहभागासाठी विशेष बक्षिसे देण्यात आली. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि जबाबदार नागरिकत्वाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन विकसित झाला.

Advertisement

या कार्यक्रमात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रेणू शर्मा मॅडम, पर्यवेक्षक श्री सिद्धेश्वर सोनवणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रेणू शर्मा मॅडम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक सवयी आत्मसात करून स्वच्छ भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे हीच कार्यशाळेची खरी फलश्रुती ठरेल.” तसेच त्यांनी नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षिका सौ. प्रतिभा शिरसाट यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. तेजस्वीनी सरोदे यांनी केले.

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष खांडगे सर, संस्थेचे उपाध्यक्ष दादासाहेब उऱ्हे, शालेय समिती अध्यक्षा सौ. रजनीगंधा खांडगे, कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे, सचिव श्री मिलिंद शेलार यांनी या उपक्रमाचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page