स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचा भव्य बक्षीस वितरण सोहळा

SHARE NOW

तळेगाव दाभाडे:

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. विविध क्रीडा प्रकारात विजेत्या खेळाडूंचा व विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात केलेल्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती ही खास आकर्षण ठरली.

 

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे क्रिकेट फिटनेट असोसिएशनचे प्रशिक्षक श्री प्रसाद क्षीरसागर सर, स्काऊट-गाईडचे डेप्युटी कमिशनर श्री विजय जोरी सर, तसेच श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री मिलिंद शेलार सर उपस्थित होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ रेणू शर्मा , पर्यवेक्षक श्री सिद्धेश्वर सोनवणे , विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री प्रशांत भालेराव, तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ रेणू शर्मा यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडेचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा स्वागतपर सत्कार संस्थेचे सचिव श्री मिलिंद शेलार सरांच्या हस्ते करण्यात आला.

Advertisement

विद्यालयातील विद्यार्थिनींनी सादर केलेले स्वागत गीत विशेष लक्ष वेधून गेले.

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री प्रसाद क्षीरसागर सरांनी आपल्या प्रेरणादायी मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम, शिस्त आणि खेळातील प्रामाणिकपणाची मूल्ये सांगत पुढील आयुष्यातही खेळाची आवड जपण्याचे आवाहन केले.

 

यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पदक,पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिळवलेला सन्मान आणि क्रीडांगणातील त्यांची चमकदार कामगिरी पाहून उपस्थित पालकवर्गाने देखील दाद दिली. याप्रसंगी उत्कृष्ट पथ संचलन म्हणून ग्रीन हाऊसना गौरविण्यात आले..

 

उत्साह, आनंद आणि गौरवाचा संगम ठरलेला हा क्रीडा महोत्सव सर्वांच्या मनावर अमिट छाप पाडून गेला.

विद्यालयाच्या शिक्षिका सौ. सुजाता गुंजाळ व सौ रूपाली कांबळे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले. श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष खांडगे सर, संस्थेचे उपाध्यक्ष दादासाहेब उऱ्हे ,शालेय समिती अध्यक्षा सौ रजनीगंधा खांडगे , कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे , सचिव श्री मिलिंद शेलार यांनी या कार्यक्रमाची कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page